‘लोकसंवाद’चे दुसरे पुष्प…
‘जीएसटी : काही अनुत्तरीत प्रश्न’
औरंगाबाद : संपूर्ण देशभरात दि. १ जुलै २०१७ रोजी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) केंद्र शासनाच्या वतीने लागू करण्यात आला, जीएसटी लागू झाल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ व विरोधात अशा दोन्हीही बाजूच्य़ा प्रतिक्रिया समाज्यात उमटल्या. व्यापारी वर्गाने विशेष करुन जीएसटीला मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. या सर्व घडामोडी घडून एका महिन्याच्यावर कालावधी उलटला आहे. व जीएसटी आकारणी केंद्र शासनाच्या वतीने सुरू झालेली आहे. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर प्रसिध्द अर्थविषयक सल्लागार व सी.ए. अजीत जोशी (मुंबई) यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन ‘लोकसंवाद’ या उपक्रमात करण्यात आलेले आहे. या उपक्रमाचे हे दुसरे पुष्प आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्र संवाद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीएसटी : काही अनुत्तरीत प्रश्न’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन शनिवार दि. ५ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी १०.३० वाजता. आईनस्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे.
या व्याख्यानाकरिता अर्थविषयक सल्लागार, सी.ए. अजीत जोशी यांना आमंत्रित करण्यात आलेले असून ते मुंबईतील इंन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयात सहायक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. ते महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये आर्थिक व राजकीय विषयांवर स्तंभ लेखन करत असतात. तसेच सर्वेक्षण व माध्यम सल्लागार म्हणून देखील ते कार्यरत आहेत. जीएसटीच्या अनुषंगाने त्यांचा विशेष अभ्यास आहे.
आताच्या परिस्थितीवर नेमकेपणाने सर्वांगीण मांडणी करणा-या या विशेष व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय केंद्राचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव मुकुंद भोगले, नीलेश राऊत. डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर, सुबोध जाधव, रेणूका कड आदींनी केले आहे.