औरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच जात असून आज दिवसभरात तब्बल 29 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबादच्या चिंतेत वाढ झाली आहे
आज सकाळी शहरात तीन नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, त्यामध्ये भीमनगर-भावसिंगपुरा येथील एक 16 वर्षाची मुलगी, नुर कॉलनीतून एक 5 वर्षांचा मुलगा आणि किलेअर्क भागातील आणखी एक 65 वर्षीय महिला पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर संध्याकाळी असेफिया कॉलनी, नूर कॉलनी व किलेअर्क भागातील तब्बल 27 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. आज तब्बल 30 रुग्णांची भर पडल्याने औरंगाबादेत एकूण कोरोनाबधितांची संख्या आता 83 वर पोचली आहे.
आज दिवसभरात 29 रुग्ण रुग्ण Positive आढळून आले आहेत.
किलें अर्क परिसरातील quartine केंद्रातील – 16
एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधील – 11
पदमपुरा येथील quartine केंद्रातील- 01
आणि घाटीत संशयित म्हणून दाखल असणारा- 01
असे आज एकूण 29 positive आले आहेत.
किलेअर्कमधील 60 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा घाटीमध्ये मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 25 रोजी दाखल करण्यात आलेल्या किलेआर्कमधील रहिवासी 60 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा आज (दि.27 रोजी)दुपारी 12.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, कोरोनामुळे मृत्अयू पावलेल्सयांची संख्ल्याया आता सहा झाली आहे.
दिलासादायक: एका रुग्णाला डिस्चार्ज
आज सकाळी बायजीपुरा येथील रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले असून शहरात एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे. अजून दोन रुग्णांचा दुसरा अहवाल येणे बाकी असून तो निगेटिव्ह आला तर त्यांना देखील रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात येईल.
औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची माहिती
- कोरोना रुग्णांची एकूण संख्या 82
- कोरोनामुक्त झालेले रुग्ण 23
- मृत्यू पावलेली व्यक्ती 06
- दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्ण 30
- सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 5
- एकूण टेस्ट झालेल्या रुग्णांची संख्या 1,611
GIPHY App Key not set. Please check settings