पुणे-नगर-औरंगाबाद महामार्गावर पुणे ते शिरूर या रस्त्यावर दुमजली पुलाचा रस्ता (एलिव्हेटेड कॉरिडोर) होणार आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने सात हजार २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याबद्दलल 29 जुलै 2021 रोजी टेंडर काढण्यात आले असून साधारणपणे सध्याच्या 4-लेन महामार्गावर अजून 4-लेन इलेव्हेटेड कॉरिडॉर असा एकूण 8 लेनचा रस्ता निर्माण केला जाणार आहे, सोबतच शिक्रापूर-चाकण-तळेगाव या महामार्गाचे देखील चौपदरीकरण करण्यात येणार आहे.
औरंगाबाद नगर पुणे या NH753F महामार्गाचा विस्तारीकरणांचा प्रकल्प 2018 साली भारतमाला या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातून करण्यात येणार होता, पण जमीन अधिग्रहणकरिता खूप मोठा खर्च लागत असल्यामुळे हा प्रकल्प मागे पडला. या नंतर स्वतंत्र नवीन ग्रीनफिल्ड महामार्गाकरिता देखील चाचपणी करण्यात आली.
सद्य स्थितीत औरंगाबाद पुणे रस्त्यावर पुणे शहराच्यालागत वाघोली, शिक्रापूर ते रांजणगावपर्यंत नागरीकरण मोठ्या वाढले आहे. त्यापाठोपाठ येथील वर्दळही वाढली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. लोणीकंद, केसनंद फाटा, कोरेगाव भीमा, वाघोली, शिक्रापूर आणि रांजणगाव या ठिकाणी वाहतूक कोंडी जास्त होते. त्यामुळे औरंगाबाद ते पुणे हे 234किमी अंतर पार करण्याकरिता 6-7 तास वेळ लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील कोंडीवर उपाय म्हणून विविध पर्यायांचा विचार विचार करण्यात येत होता. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले आणि भूसंपादन करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या ठिकाणी दुमजली पुलांसह आठ पदरी रस्ते करण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे.
शिक्रापूर- चाकण – तळेगाव रस्त्याचे चौपदरीकरण
शिक्रापूर मार्गे पिंपरी-चिंचवड, मुंबईकडे जाणारा आणि तळेगाव चाकण आणि शिक्रापूर येथील औद्योगिक वसाहतींना जोडणारा रस्ताचे विस्तारीकरण करण्यात येणार असून, हा मार्ग चारपदरी करण्यात येणार आहे. या रस्त्याची लांबी ५४ किलोमीटर असून त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
GIPHY App Key not set. Please check settings