आदित्य ठाकरे यांची ऑरिक सिटीला भेट; ऑरिक हॉल येथे स्टार्टअप्स इनक्युबेशन सेंटरसाठी जागा राखीव ठेवण्याची केली सूचना

0
1672

राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबाद येथील ऑरिक सिटी या भारतातील पहिल्या स्मार्ट औद्योगिक वसाहतीला भेट दिली, याप्रसंगी शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि एआयटीलच्या अधिकाऱ्यांनी त्यांना येथील झालेल्या कामाची माहिती दिली.
या भेटी दरम्यान आदित्य ठाकरे यांनी शेंद्र येथील प्रशासकीय इमारत असलेल्या ऑरिक हॉलची भेट दिली. सिटी कमांड सेन्टर, ऑरिकचे थ्रीडी मॉडेल याची पाहणी केल्यानंतर एआयटीलच्या अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची माहिती सांगणारे प्रेसेंटेशन करण्यात आले.

ऑरिक हॉल येथे स्टार्टअप्ससाठी जागा राखीव ठेवण्याची सूचना
ऑरिक हॉलची माहिती घेत असतांना आदित्य ठाकरे यांनी या हॉलमध्ये आयटी कंपन्या तसेच विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या तरुण मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी स्टार्टअप्स साठी जागा राखीव ठेवण्याची सूचना केली. तसेच मियामकी पद्धतीने डेन्स फॉरेस्ट, सार्वजनिक स्वच्छतागृह, आणि नागरी वसाहतीमध्ये पोलिसांच्या घरकुल योजनेसाठी जागा राखीव ठेवण्याची सूचना केली.
सिटीकट्टाशी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले कि, ऑरिक वसाहतिचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण करण्यात येणार असून लवकरच देश विदेशातील मोठे उद्योग येथे येतील. नवी मुंबईच्या धर्तीवर येथे शहराचा विकास करण्यात येणार असून. पर्यावरणपूरक उद्योग येथे यावे यासाठी विशेष लक्ष दिले जाईल.

पैठण रस्ता, शेंद्रा-बिडकीन लिंक रोडसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी बोलणी करणार
शेंद्रा आणि बिडकीन वसाहतींना जोडणारा रस्ता, आणि औरंगाबाद – पैठण चार पदरी रस्त्याचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अशी अपेक्षा एआयटीलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली, त्यावर बोलतांना ठाकरे म्हणाले कि या बाबत लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी बोलून काम सुरु करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. शेंद्रा नोडला मुंबई नागपूर एक्स्प्रेसवेशी जोडणारा रस्ता आणि इंटरचेंजसाठी त्यांनी होकार दिला. तसेच अन्य मागण्याचे प्रस्ताव पाठव्ण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

दिल्ली- मुंबई औद्योगिक कॉरीडोरअंतर्गत विकसित होणाऱ्या ऑरिक या स्मार्ट वसाहतीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्या हस्ते मागील वर्षी करण्यात आले असून, ऑरिक वसाहत या कॉरीडोरमधील सर्वात वेगाने विकसित होत असून मराठवाड्याच्या विकासाचे केंद्रबिंदू म्हणून पुढील काही वर्षात नावारुपाला येईल असा विश्वास ऑरिक प्रशासनाने व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here