आंब्याचा हंगाम म्हंटला कि सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते हे नक्की. त्यात जर कोणाकडे आंब्याची बाग असली तर विषयचं संपला. प्रत्येकजण या फळाच्या राजाची वाट वर्षभर बघत असतो. फळांचा राजा कदाचित आंब्याला यासाठीच म्हंटले जाते, कारण त्याची किंमत ही राजासारखीच असते. आंबे बाजारात आले कि त्याची किंमत पाहूनच डोळे फिरतात. त्यामुळे ह्या फळाचा आस्वाद तसा सगळ्यांना घेता येत नाही आणि याच सगळ्याचा विचार करून रेडियो मिर्चीच्या आरजे निमीने एक आगळी – वेगळी मोहीम हाती घेतली आहे, ज्याचं नाव आहे #आमख़ुशी.
औरंगाबादमधील असे काही लोक ज्यांनी या आंब्याच्या महिन्यात आंबे चाखलेच नाही आहे (त्याच्या किंमतीमुळे ) अशा व्यक्तीपर्यंत आंबे पोहोचवण्याचे काम निमीने हाती घेतले आहे. निमीने सगळ्या औरंगाबादकरांना आवाहन केले आहे कि या शनिवारी जितके आंबे देणे शक्य आहे, तितके आंबे रेडियो मिर्चीच्या कार्यालयात जमा करायचे आहे. जमा झालेले आंबे येत्या रविवारी सकाळी ११ वाजता औरंगाबाद शहरात काही ठिकाणी औरंगाबादकरांना सोबत घेऊन वाटली जाणार आहेत.
आम लोकांना आम ख़ुशी देण्यासाठी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद औरंगाबादकरांनी द्यावा असे आवाहन रेडियो मिर्ची, औरंगाबादकडून करण्यात आले आहे.
सुयश टिळक, किशोरी शहाणे तसेच काही मराठी तारकांकडून या उपक्रमास पाठिंबा मिळत आहे.
‘आम’ लोकांना ‘आमख़ुशी‘ देण्यासाठी औरंगाबादकरांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रेडियो मिर्ची, औरंगाबादकडून करण्यात आले आहे.