भारतामध्ये कल्पकतेला काही कमी नाही, हे दाखवणारा एक व्हिडियो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. औरंगाबाद शहरातील बारूगदार नाला येथे राहणारा मोहम्मद फैझान या मुलाने बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली, त्याबाबतचा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर करण्यात आला. हा व्हिडियो बघून महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी या मुलाशी मला संपर्क करायला आवडेल असे ट्विट केले आहे. या बाईकचा शोध लावणारा तरुणाचा विश्वास आणि त्याच्या दिसण्यातील बोलण्यातील ऊर्जा स्तृती करतांना हा उभारता सितारा आहे असे नमूद केले.
हा औरंगाबादमधील मोहम्मद फैझान आहे. त्याने बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली आहे. भविष्यात यामधूनच बाईकही तयार करता येईल. भारतामध्ये कौशल्याची कमी नाहीय. आशा आहे एखादी कंपनी त्याच्या या प्रयोगाकडे लक्ष देईल आणि त्याला मदत करतील, असे आवाहन करणारे एक ट्विट हितेंद्र सिंग या व्यक्तीने केले. त्यांनी या त्वित मध्ये आनंद महिंद्र यांना तग केले असता. त्यावर आनंद महिन्द्रांनी उत्तर देतांना म्हंटले “हा व्हिडीओ शेअर करण्यासाठी धन्यवाद. व्हिडीओमधील बाईक चालवताना थोड्या अडचणी येऊ शकतील असं वाटतय. पण या बाईकचा शोध लावणारा तरुणाचा विश्वास आणि त्याच्या दिसण्यातील बोलण्यातील ऊर्जा स्तृती करण्यासाठीच आहे. नक्कीच याला ई-ऑटो इंजिनियरिंग किंवा डिझायनिंगची सुरुवात आहे असं म्हणता येईल. हा व्हिडीओ जुना नसल्यास मला या मुलाशी संपर्क करायला आवडेल.’
Thanks for sharing this. The bike appears like it might be awkward to ride, but the young man himself looks & sounds like a supercharged bundle of energy! Certainly a budding star E-auto engineer/designer. If this isn’t an old video I’d love to be connected to him…
— anand mahindra (@anandmahindra) October 28, 2018
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडियोमध्ये औरंगाबादमधील मोहम्मद फैझान याने सायकलच्या कॅरेजवर एक बॅटरी लावून साकारलेली प्राथमिक स्वरुपातील बाईक दिसते. ३० हजार खर्च तयार केली ही बॅटरीवर चालणारी सायकल एकदा चार्ग केल्यावर ५०km अंतर चालू शकते, बॅटरी संपली तर पॅडलच्या सहाय्याने साध्या सायकलप्रमाणे ही सायकल चालवता येते, दोन तासात चार्ज होणारी ही बॅटरी ताशी वेग ३० किमोमीटर या वेगाने धावू शकते, अशी माहिती देणारा व्हिडियो हितेंद्र सिंघ यांनी ट्विटरवर शेअर केला.
GIPHY App Key not set. Please check settings