औरंगाबादमधील विविध भागातील एकूण 30 कोरोनाबाधित वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 508 झाले आहेत.
आज वाढलेल्या शहरातील कोरोनाबाधितांमध्ये (कंसात रुग्ण संख्या) संजयनगर, मुकुंदवाडी (6), कटकट गेट (2), बाबर कॉलनी (4), आसेफीया कॉलनी (1), सिल्क मिल कॉलनी (1), रामनगर-मुकुंदवाडी (1), भवानीनगर, जुना मोंढा (2) सातारा परिसर (1) पानचक्की (1) आणि जुना बाजार (1), पुंडलिक नगर (9) आणि गंगापूर (1) या परिसरातील रुग्ण आहेत. यामध्ये 15 पुरूष आणि 15 महिलांचा समावेश आहे. कोरोनाबाधित 508 रुग्णांमध्ये 311 पुरूष, 197 महिला आहेत.
आज 23 व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून औरंगाबादमध्ये एकूण 53 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.
कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये (कंसात कोरोनामुक्त झालेले रुग्ण) बागवान मस्जिद(5), नूर कॉलनी (6), किलेअर्क (3), भीमनगर(1), चेलीपुरा (1), छोटी मंडी, दौलताबाद (1), समता नगर (3), बडा टाकिया मस्जिद (1), सातारा परिसर (1), जलाल कॉलनी (1) या परिसरातील व्यक्तींचा समावेश असल्याचे रूग्णालयाने कळवले आहे.
औरंगाबाद कोरोना मीटर
• कोरोना रुग्णांची एकूण संख्या 508
• कोरोनामुक्त झालेले रुग्ण 53
• मृत्यू पावलेली व्यक्ती 12
• दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्ण 30
• सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 443
• एकूण टेस्ट झालेल्या रुग्णांची संख्या 6,068
• पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील एकूण संख्या 3,164
Updated on 20:00, 09/05/2020 | Source: AMC / DIO, Aurangabad