केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालामध्ये सर्वाधित प्रदूषित शहरांच्या यादीत औरंगाबाद शहर राज्यात तिसऱ्या स्थानावर असल्याचे जाहीर केले आहे. या यादीत महाराष्ट्रातील तारापूर, चंद्रपूर या नंतर औरंगाबादचा नंबर आहे. गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या ४३ शहरांची पाहणी केली होती. प्रत्येक शहरात पाच ठिकाणी मोजमाप व निरीक्षण यंत्रे उभारून हवा, पाणी व जमिनीतील पाण्यातील प्रदूषणाची पातळी तपासण्यात आली. त्याचे निष्कर्ष मंडळाने नुकतेच जाहीर केले आहेत. या यादीनुसार औरंगाबादचा शहराचा सूचकांक 69.85 इतका नोंदवला आहे.
सर्वाधिक प्रदूषित असलेल्या या शहरांमध्ये उद्योग हेच प्रदूषणवाढीला प्रमुख कारण असल्याचे मंडळाच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या उद्योगांना प्रदूषण नियंत्रणाच्या संदर्भात अनेक सूचना देण्यात आल्या. मात्र त्याने कोणताही फरक पडला नसल्याचे या पाहणीत आढळून आले आहे आहे. तसेच औरंगाबादेत हवेतील प्रदूषण सर्वात जास्त असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. शहरामध्ये कमी प्रमाणात असलेले ग्रीन कव्हर, रस्त्यावरील धुळीचे प्रमाण, आणि वाहनांमधून होणारे प्रदूषण हे देखील प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. या विषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य असलेल्या सुहास दाशरथे यांना विचारले असता त्यांनी “राज्यातील 17 शहरांमध्ये प्रदूषण एक मोठी समस्या आहे, त्यावर उपायजोजना करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कृती आराखडा तयार केलाअसून, 2022 पर्यंत या शहरातील वायुप्रदूषण 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबई आणि औरंगाबाद शहरांचा पहिल्या टप्यात समावेश करण्यात आलेला असून, वाहनांसाठी BS – VI प्रणाली अनिवार्य करणे, ई-व्हेकल्सला चालना देणे, हरित क्षेत्र वाढवणे इत्यादीं लक्ष ठेवण्यात आले आहे.” असे सांगितले.
प्रदूषण निर्देशांक कसा ठरतो?:
केंद्रीय व राज्य स्तरीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय परीक्षण समिती यांच्या माध्यमातून औद्योगिक परिसरांमध्ये असलेल्या प्रदूषणकारी घटकांचे गुणधर्म, प्रदूषणामुळे प्रभावित होणाऱ्या नागरिकांची संख्या तसेच उच्च धोका घटकांचा समावेश यांच्या धर्तीवर प्रदूषण निर्देशांक ठरवण्यात येतो.
GIPHY App Key not set. Please check settings