औरंगाबाद और रमजान

0
7249

तख़रीब की घटाएँ घनघोर छा रही हैं सनकी हुई हवाएँ तूफ़ाँ उठा रही हैं नाख़्वास्ता बलाएँ दुनिया पे आ रही हैं ऐसी हमा-हमी में मैं लुत्फ़ क्या उठाऊँ मैं ईद क्या मनाऊँ शायर सीमाब अकबराबादी यांच्या या ओळी सध्याच्या काळात सर्वाधिक लागू पडत आहेत. औरंगाबादसारखं शहर, जे आपल्या 'गंगाजमनी तहजीब'साठी गेली कित्येक शतके प्रसिध्द आहे, तिथं यंदा इतर सणांप्रमाणे ईदचा उत्साह काहीसा थंडावला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी रमजानच्या महिन्यातील नमाज पढण्यासाठी मशिदीत जाता आलेलं नाही. इफ्तारसाठी एकत्र येता आलं नाही. ईदमिलनही आता होणार नाही. पण तरीही नागरिकांनी खूप समजूतदारपणा दाखवला त्याबद्दल अभिनंदन आणि आभारही. या ईदच्या काळात शहरात एकप्रकारे रौनक असायची. रोशनगेटपासून मकाईगेटपर्यंत आणि पैठणगेटपासून दिल्लीगेटपर्यंत सगळीकडे लोकांचा दिवसरात्र राबता असायचा. नान-कलियां, कबाबसारखे विविध खाद्यपदार्थ आणि फालुदा वगैरे पेयांसाठी बुढीलेन रात्रभर झगमगत असायची. केवळ मुस्लिमच नव्हे, तर सर्वधर्मीय लोक तिथं जाऊन याचा आस्वाद घ्यायचे. यावर्षी हे सगळं बंद आहे. शहागंजच्या भव्य मशिदीभोवती आणि निजामकालीन क्लॉक टॉवरच्या छायेत भरणारा मीना बाजार, ईदनंतर आमखास मैदानावर भरणारा ईद बाजार आणि कपडेखरेदीसाठी गच्च गजबजलेल्या टिळक पथावर आज शुकशुकाट आहे. मिल के होती थी कभी ईद भी दीवाली भी। अब ये हालत है कि डर-डर के गले मिलते हैं।। या कुणा अनामिक शायराच्या ओळी मात्र तंतोतंत खऱ्या आहेत. फक्त या वर्षी संयम पाळू या. गळाभेट नको, 'सलाम-नमस्ते' करू या. सुरक्षित अंतर पाळून कोरोनाच्या संकटावर मात करू या. तरच पुढच्या वर्षी इफ्तार पार्टीसाठी एकत्र जमता येईल. काही दिवसांत हे संकट सरेल आणि आपण सगळेच पुढच्या रमजान महिन्यात बुढीलेनमध्ये भेटू शकू, या आशेसह सर्वांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा!! -Team Amazing Aurangabad and CityKatta

Posted by Aurangabad on Saturday, May 23, 2020

तख़रीब की घटाएँ घनघोर छा रही हैं
सनकी हुई हवाएँ तूफ़ाँ उठा रही हैं
नाख़्वास्ता बलाएँ दुनिया पे आ रही हैं
ऐसी हमा-हमी में मैं लुत्फ़ क्या उठाऊँ
मैं ईद क्या मनाऊँ

शायर सीमाब अकबराबादी यांच्या या ओळी सध्याच्या काळात सर्वाधिक लागू पडत आहेत. औरंगाबादसारखं शहर, जे आपल्या ‘गंगाजमनी तहजीब’साठी गेली कित्येक शतके प्रसिध्द आहे, तिथं यंदा इतर सणांप्रमाणे ईदचा उत्साह काहीसा थंडावला आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी रमजानच्या महिन्यातील नमाज पढण्यासाठी मशिदीत जाता आलेलं नाही. इफ्तारसाठी एकत्र येता आलं नाही. ईदमिलनही आता होणार नाही. पण तरीही नागरिकांनी खूप समजूतदारपणा दाखवला त्याबद्दल अभिनंदन आणि आभारही.

या ईदच्या काळात शहरात एकप्रकारे रौनक असायची. रोशनगेटपासून मकाईगेटपर्यंत आणि पैठणगेटपासून दिल्लीगेटपर्यंत सगळीकडे लोकांचा दिवसरात्र राबता असायचा. नान-कलियां, कबाबसारखे विविध खाद्यपदार्थ आणि फालुदा वगैरे पेयांसाठी बुढीलेन रात्रभर झगमगत असायची. केवळ मुस्लिमच नव्हे, तर सर्वधर्मीय लोक तिथं जाऊन याचा आस्वाद घ्यायचे. यावर्षी हे सगळं बंद आहे.

शहागंजच्या भव्य मशिदीभोवती आणि निजामकालीन क्लॉक टॉवरच्या छायेत भरणारा मीना बाजार, ईदनंतर आमखास मैदानावर भरणारा ईद बाजार आणि कपडेखरेदीसाठी गच्च गजबजलेल्या टिळक पथावर आज शुकशुकाट आहे.

मिल के होती थी कभी ईद भी दीवाली भी।
अब ये हालत है कि डर-डर के गले मिलते हैं।।

या कुणा अनामिक शायराच्या ओळी मात्र तंतोतंत खऱ्या आहेत. फक्त या वर्षी संयम पाळू या. गळाभेट नको, ‘सलाम-नमस्ते’ करू या. सुरक्षित अंतर पाळून कोरोनाच्या संकटावर मात करू या. तरच पुढच्या वर्षी इफ्तार पार्टीसाठी एकत्र जमता येईल.

काही दिवसांत हे संकट सरेल आणि आपण सगळेच पुढच्या रमजान महिन्यात बुढीलेनमध्ये भेटू शकू, या आशेसह सर्वांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा!!

-Team Amazing Aurangabad and CityKatta

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here