29 एप्रिल 2020| दुपारी 3 वाजता
शहरात कोरोनाचा कहर सुरूच असून आज सकाळी अकरा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, त्यानंतर दुपारी पुन्हा 8 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नूर कॉलनी टाऊन हॉल येथील 4 तर असेफिया कॉलनी किलेअर्क भागातील 4 अशा आठ जणांचा यात समावेश असल्याची माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. त्यामुळे औरंगाबादेत आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 128 वर जाऊन पोहोचली आहे.
29 एप्रिल 2020| सकाळी 10वाजता
औरंगाबादेत आणखी 11 जणांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या 120
यामध्ये नूर कॉलनी येथील 9, गारखेडा 1, भीमनगर 1 येथील नागरिकांना लागण झाली आहे. अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. एकूण बाधीत संख्या 120 वर गेली आहे.
28 एप्रिल 2020| रात्री 10 वाजता
औरंगाबादेत एसआरपीएफ जवानाला कोरोना; रुग्णसंख्या पोहनचली १०९ वर
रात्री आलेल्या अहवालामध्ये आणखी चार रुग्णांची भर पडत हा आकडा १०९ वर गेल्याने शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. या एक एसआरपीएफ जवान पॉझिटिव्ह आढल्याने खळबळ उडाली आहे. रात्री आढळून आलेले रुग्ण चेलीपुरा, असिफिया कॉलनी, पैठण गेट, सातारा परिसर येथील प्रत्येकी एक असल्याचे डॉ नीता पाडळकर यांनी सांगितले यापैकी 3 पुरुष एक महिला आहेत. तसेच यातील एक रुग्ण हा एसआरपीएफ जवान असल्याची माहिती पुढे आली आहे.
28 एप्रिल 2020| दुपारी 03 वाजता
औरंगाबादेत कोरोनाने मंगळवारी शतक पार केले. सकाळी १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येत नाही, तोच दुपारी आणखी १० नागरिकांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या आता १०५ झाली आहे. शहरात मंगळवारी दुपारपर्यंत २३ नागरिकांचा अहवाल आले आहे, अशी माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. यात संजय नगर- मुकुंदवाडी येथे २ रुग्ण, पैठण गेट येथे ४, सिल्लेखाना येथे एक , किल्लेअर्क येथे एक , भीमनगर- भावसिंगपुरा येथे एक आणि दौलताबाद येथे एक रुग्ण आढळून आला आहे.
28 एप्रिल 2020| सकाळी 10वाजता
शहरात कोरोना विषाणूने चांगलेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. काल (दि. 27 एप्रिल ) एकाच दिवशी तब्बल तब्बल २९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते आणि एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. आज सकाळी आलेल्या अहवालामध्ये आणखी १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे औरंगाबादेत रुग्णसंख्या आता ९५ झाली आहे. यापैकी २३ रुग्ण कोरोनामुक्त झाले ऑन, आतापर्यंत 6 व्याक्रींचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आज सकाळी पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी किल्लेअर्क भागातील १२ रुग्ण तर जण भीमनगर- भावसिंगपुरा येथील एक रुग्ण आहे. विशेष म्हणजे यामध्ये १६ वर्षाच्या आतील ६ जणांचा समावेश आहे.७ रुग्ण हे ४४ वर्षाच्या आतील त्यात ४ महिला आणि ३ पुरुष आहेत, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
GIPHY App Key not set. Please check settings