औरंगाबादकर ! कनेक्ट ….शहरासाठी!
आपण सारेच कचरा प्रश्नावर हैराण आहोत..गेल्या आठवड्यापासून कचरा समस्या निवारण करण्यासाठी अनेक माणसं, संस्था काम करत आहेत (आधीही होत्याच ) पण गांभीर्याने यावर काम सुरु झालंय. ९ मार्च पासून शहरातील काही नागरिकांनी एकत्रित येत क्रांती चौकातून सकारात्मक पाऊल उचलले आणि बघता बघता यात अनेकजन स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले..सोशल मिडियाने याला वेग दिला…Aurangabad Connect Team या नावाने सगळे कामाला लागले..कुणी नेता नाही की कुणी पदाधिकारी नाही..”नावासाठी नाही तर गावासाठी” ही भावना बाळगत नागरिक येत आहेत, कुणी जनप्रबोधन करतंय तर कुणी आपल्या घरी, कॉलनीत वर्गीकरण, कम्पोस्टिंग इत्यादी कामात हातभार लावत आहे.
एक आता पुढचा टप्पा नियोजन आणि टीम बिल्डींगचा…आपण एकत्र आलो, पण ही चळवळ गतिमान करत अनेक नागरिक यात सहभागी झाले तर आणि तरच आपण आपल्या औरंगाबादला पुन्हा जगण्यासाठी सुसह्य करू शकतो..कचरा ही एकच समस्या नाही..भविष्यात अनेक गोष्टी साठी पुढे येत काम करावे लागणार आहे. आपण सकारात्मक आहोत याचा अर्थ कधी चुका कुणाला जाब विचारणार नाही असं नाही..वेळप्रसंगी नकली आणि वाईट वृत्ती विरुद्ध लढू..शहर हितासाठीच ! सोबत असावी…आपण नेकदिलाने काम करू…कोणताही राजकीय रंग नसलेले हे बिगर राजकीय व्यासपीठ आहे…यामुळेच नाव ”औरंगाबाद कनेक्ट…”! आपण राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असलात तरी स्वागत आहे…फक्त पक्षाचे जोडे बाहेर काढून कनेक्ट व्हा..अनेक सामाजिक कार्यकर्ते शहरात विविध कामे करत आहेत…या सगळ्यांनी एकत्र आलं तर मोठे काम उभे राहण्यासोबतच …….नक्की या ! केवळ एक तास तुमच्या शहरासाठी ..आपल्या औरंगाबादसाठी!
GIPHY App Key not set. Please check settings