30 एप्रिल 2020 | रात्री 8 वाजता
औरंगाबादमध्ये कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. आज संध्याकाळी तब्बल २६ पॉझिटिव्ह अहवाल आले असून दिवसभरात ४७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये संजय नगर, मुकुंदवाडी, नूर कॉलनी, खडकेश्वर, एमआयटी बीड वायपास, रोहिदास नगर मुकुंदवाडी, नारेगाव अजीज कॉलनी, रोशन गेट, भीमनगर, किलेअर्क असे तब्बल २६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे यातील पाच भाग हे नवीन हॉटस्पॉट आहेत. त्यामुळे शहरभरत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसभरात तब्बल ४७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने औरंगाबादेत रुग्णसंख्या 184 वर जाऊन पोहोचली आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
30 एप्रिल 2020 | दुपारी 3 वाजता
दुपारी आणखी 7 रुग्णांची भर पडली. यामध्ये किलेअर्क 4, नूर कॉलनी 2, भीमनगर 1 असे सात रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
30 एप्रिल 2020 | सकाळी 9 वाजता
औरंगाबादमधील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख सलग वाढत आहे. गुरुवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार आणखी 14 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. औरंगाबादमधील बाधितांचा आकडा 144 वर गेला आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली. आज आढळलेल्या रुग्णांत भीमनगर येथील ६, किलेअर्क १, आसिफिया कॉलनी २ , नूर कॉलनी १, कैलास नगर १, चिकलठाणा १, सावरकर नगर १ जिल्हा रुग्णालय, घाटी मधील १ अशा १४ जणांचा समावेश आहे. असे डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले
GIPHY App Key not set. Please check settings