औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या आज दोनशेच्या पार गेली असून, औरंगाबादमधील कोरोना रुग्णसंख्या २०९ झाली आहे. शहरात मागील पाच दिवसांमध्ये पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण वाढले असून हि बाब शहरास्ठी अतिशय चिंताजनक आहे.
१ मे २०२०| सायंकाळी ७ वाजता
आज दिवसभरात ३२ रुग्णांची भर पडली आहे.
आज दुपारपर्यंत २९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आणि किराडपुरा येथील कोरोनामुक्त युवकास रुग्णालयातून सुटी अशा दोन सकारात्मक घटनेनंतर शुक्रवारी सायंकाळी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे. यात संजय नगर- मुकुंदवाडी -१८, नूर कॉलनी ३, वडगाव १, आसिफिया कॉलनी ३, भडकल गेट १ , गुलाबवाडी- पदमपुरा २, सिटी चौक १, मेहमूदपुरा १ , जय भीमनगर (टाऊन हॉल) २ अशी रुग्ण संख्या असल्याची माहिती माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली.
१ मे २०२०| दुपारी ४ वाजता
किराडपुरा येथील कोरोनामुक्त युवकाला रुग्णालयातून डिस्चार्ज; दुपारपर्यंत आलेले सर्व अहवाल निगेटिव्ह
किराडपुरा येथील 22 वर्षीय युवक कोरोनामुक्त झाल्याने त्याला शुक्रवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या २४ झाली आहे. आज दुपारपर्यंत आलेले सर्व 292 अहवाल निगेटिव्ह आले असून हि बाब शहरादाठी काही प्रमाणात दिलासादायक आहे.
१ मे २०२०| सकाळी १० वाजता
गुरूदत्तनगर येथील एका रूग्णाचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरातील गुरूदत्त नगर येथील 47 वर्षीय रुग्णास 27 एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज सकाळी 6.20 मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आता शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 8 झाली आहे.
सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात 11 कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत.व्यवसायाने वाहन चालक असलेल्या गुरू दत्तनगर येथील या रूग्णास सात दिवसांपासून ताप, कोरडा खोकला आणि चार दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. संबंधित लक्षणे कोविड 19 आजाराची दिसत असल्याने त्यांना संशयित कोविड कक्षात भरती केले होते. तिथे त्यांच्या लाळेचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठविल्यानंतर तो अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्यानंतर त्यांना कोविड कक्षात हलविण्यात आले. तिथे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. न्यूमोनिआ, श्वसन विकार असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असेही घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे.
GIPHY App Key not set. Please check settings