#CoronaUpdate | 9am
जिल्ह्यात 1276 कोरोनाबाधित, आज 28 रुग्णांची वाढ
औरंगाबाद जिल्ह्यात आज 28 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1276 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद शहरामध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
न्याय नगर, गारखेडा (2), टाऊन हॉल (1), सईदा कॉलनी, जटवाडा रोड (3), कैलास नगर (4)
राम नगर, एन-2, सिडको (4), नारळीबाग (1), गौतम नगर, जालना रोड (1), संभाजी कॉलनी, सिडको (1)
महेश नगर (1), जुना बाजार (1), एमजीएम परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), शंकुतला नगर, शहानूरवाडी (1), औरंगपुरा (2), आशियाद कॉलनी, बीड बायपास (1), वडगाव कोल्हाटी (2), अब्दाशहा नगर,सिल्लोड (1)
या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 13 महिला आणि 15 पुरूष रुग्णांचा समावेश आहे.