औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 72 एसआरपी जवानांसह तब्बल 90 कोरोनाबाधित रुग्णांची आज सकाळी आलेल्या चाचणी अहवालात भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 468 झाले आहेत. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ ठरली .
शहराजवळील सातारा परिसरात राज्य राखीव पोलीस दलाचा (एसआरपीएफ) कॅम्प आहे . या कॅम्पमधील जवान कोरोना चा हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव शहरात काही दिवसांपूर्वी बंदोबस्तासाठी गेलेले होते. तसेच काही दिवसांपूर्वी याच कॅम्पमधील एका जवानास कोरोनाची बाधा झालेली आहे. मालेगाव येथून परतल्यावर या 72 जवानांच्या लाळेचे नमुने काल तपासणी साठी घेण्यात आले होते. आज शुक्रवारी या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील आज सकाळी आढळून आले कोरोनाबाधित रुग्ण हे एसआरपीएफ कॅम्प (72) जयभीम नगर (4), बेगमपुरा (4), भीमनगर, भावसिंगपुरा (1), शाह बाजार (01), ध्यान नगर, गारखेडा (01), लघुवेतन कॉलनी, मुकुंदवाडी (1), बायजीपुरा (3), कटकट गेट (1), सिकंदर पार्क (1) आहेत. तर ग्रामीण भागातील खुलताबाद (1) येथील आहेत. यामध्ये 83 पुरूष आणि 7 महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.
GIPHY App Key not set. Please check settings