औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 24 कोरोनाबाधित वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 321 झाले आहेत. आज वाढ झालेल्या रुग्णांमधील कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) जयभीम नगर (21), अजब नगर (1), संजय नगर (1), बौद्ध नगर (1) या परिसरातील आहेत. यामध्ये 14 पुरूष आणि दहा महिला रुग्ण आहेत.
भडकल गेट, टाऊन हॉल येथील 58 वर्षीय कोविड रूग्णाचा उपचारादरम्यान खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. त्यामुळे औरंगाबादमध्ये आतापर्यंत 11 जणांच्या मृत्यूस कोविड आजार कारणीभूत ठरला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) रुग्णालयात बायजीपुऱ्यातील 28 वर्षीय कोविडग्रस्त मातेच्या चिमुकलीचा अहवाल निगेटीव्ह आला. घाटीत कोविड मातेच्या बाळाची डॉक्टर घेताहेत काळजी
इंदिरानगर बायजीपुऱ्यातील 28 वर्षीय महिलेची नैसर्गिक प्रसूती शनिवारी (दि.2 मे) दुपारी १२ वाजता झाली. मातेचा रिपोर्ट कोविड पॉझिटीव्ह आल्याने लगेच चिमुकलीस डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल वॉर्डातील एनआयसीयूमध्ये दाखल केले होते. या चिमुकलीचा रिपोर्ट आज निगेटिव्ह आला. या चिमुकलीची संपूर्ण काळजी कर्तव्यावरील परिचारिका व डॉक्टर्स घेताहेत. डॉ.एल.एस.देशमुख व इतर नवजात शिशु विभागातील अध्यापक, कर्मचारी बाळाची देखभाल तत्परतेने करताहेत. आता चिमुकलीच्या आजीची कोविड चाचणी करण्यात येत आहे. त्या प्राप्त होणाऱ्या अहवालावरून चिमुकलीबाबत घ्यावयाच्या खबरदारीबाबत वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे. चिमुकलीचे आजोबा व इतर नातेवाईकांशी घाटी प्रशासनाकडून टेलीकॉउंसेलिंग (फोनद्वारे समुपदेशन) करण्यात येते आहे.
औरंगाबाद कोरोना मीटर
• कोरोना रुग्णांची एकूण संख्या 321
• कोरोनामुक्त झालेले रुग्ण 26
• मृत्यू पावलेली व्यक्ती 11
• दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्ण 24
• सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 284
• एकूण टेस्ट झालेल्या रुग्णांची संख्या 4,351
• पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील एकूण संख्या 2,429
Updated on 20:00, 05/05/2020
Source: DIO, Aurangabad