in ,

Aurangabad Covid-19 Update | 2 June 2020

जिल्ह्यात 1085 कोरोनामुक्त, 480 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1085 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 480 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 62 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात 1649 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) 
शहा बाजार (1), किराडपुरा (2), चंपा चौक (1), कटकट गेट (1), नारळीबाग (1), गणेश कॉलनी (1), जवाहर नगर (3), भीम नगर (2), हमालवाडी (1), शिवशंकर कॉलनी (2), नाथ नगर (2), ज्योती नगर (1), फजलपुरा परिसर (1), मिल कॉर्नर (1), एन-3 सिडको (1), एमजीएम परिसर (1), रोशन गेट (1) , विशाल नगर, गारखेडा परिसर (1), एन-सहा संभाजी कॉलनी (7), समता नगर (6), अंहिसा नगर (1), मुकुंदवाडी (1), विद्या निकेतन कॉलनी (1), न्याय नगर (1), बायजीपुरा (2), संजय नगर, मुकुंदवाडी (4), विजय नगर (2), चंपा चौक, म्हाडा कॉलनी (1), नेहरु नगर (1), जुना मोंढा नाका परिसर (1), सिडको वाळूज महानगर (1), तक्षशील नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), राजा बजार (1), कोतवाल पुरा (1), भाग्य नगर (1), अन्य (3) आणि यशवंत नगर, पैठण (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला आणि 35 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत 1085 जण कोरोनामुक्त
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) 02, जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) 06 रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आतापर्यंत एकूण 1085 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

घाटीत पाच, खासगीत एका कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये 02 जून रोजी मध्यरात्री एक वाजता शहागंज येथील 54 वर्षीय पुरूष, पहाटे चार वाजता पिसादेवी रोड, गौतम नगर येथील 69 वर्षीय स्त्री, सकाळी 7 वाजता कैलास नगर येथील 56 वर्षीय पुरूष, दुपारी 2.30 वाजता गणेश कॉलनीतील 61 वर्षीय पुरूष, दुपारी 3.30 वाजता बायजीपुरा येथील 55 वर्षीय महिला या कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातील कोरोनबाधित असलेल्या 64 वर्षीय पुरूष रुग्णाचा 1 जून रोजी रात्री 11.30 वा. उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 68, तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 15, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 84 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

What do you think?

Written by Admin

CityKatta : Aurangabad's own social media platform

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

औरंगाबाद ग्रीन झोनमध्ये आणावे – पालकमंत्री सुभाष देसाई

NHAI to acquire land for Mumbai-Aurangabad-Nagpur High Speed Rail Corridor