शहरातील कचराकोंडीला फक्त आणि फक्त महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर एकमेव जबाबदार असून, मागील पाच महिन्यांमध्ये त्यांनी कागदी घोडे नाचविण्यातच वेळ वाया घालविला. एकही ठोस निर्णय घेण्यास आयुक्त तयार नाहीत, असा जोरदार प्रहार महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर केला. कचराकोंडीमुळे उद्या शहरात काही झाल्यास मी जबाबदार राहणार नाही, असे विधान मनपा आयुक्तांनी केले. म्हैसकर यांनी मनपा आयुक्तांना ठणकावत सांगितले की, जबाबदारीपासून असे अजिबात पळता येणार नाही. आयुक्त म्हणून सर्वस्वी जबाबदारी तुमचीच आहे.
GIPHY App Key not set. Please check settings