5 व्या आंतरराष्ट्रीय औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलचे वेळापत्रक जाहीर

0
340
 नाथ ग्रुप व महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद आयोजित 5 व्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे वेळापत्रक संयोजकांच्यावतीने जाहीर करण्यात आलेेले आहे. दि. 18 ते 21 जानेवारी 2018 दरम्यान आयनॉक्स, प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे सदरील फेस्टिव्हल संपन्न होणार आहे. गुरुवार, दि. 18 जानेवारी रोजी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर स्क्रिन क्र. 4 येथे बहुचर्चित असा ‘रुख’ हा हिंदी सिनेमा दाखविला जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अतनू मुखर्जी व अभिनेत्री स्मिता तांबे हे याप्रसंगी रसिकांसमवेत संवाद साधतील.
Festival Schedule of 5th Aurangabad International Film Festival
शुक्रवार, दि. 19 जानेवारी 2018 रोजी स्क्रिन क्र.2 येथे स. 10 वा. पाथीराकलम हा मल्ल्याळी भाषेतील सिनेमा, दु. 12.45 मि. जुनून हा शाम बेनेगल दिग्दर्शित हिंदी सिनेमा, दु. 3.30 वा. अनन्या हा आसामी सिनेमा, सायं. 5.45 वा. क्षितीज हा मराठी सिनेमा तर रात्री 8 वा. ब्रेथ हा इराणी सिनेमा दाखविण्यात येणार आहे. तर स्क्रिन क्र.3 येथे स. 10 वा. अलीगढ आणि दु. 2.45 वा. कालीघाट हे हिंदी चित्रपट, तर दु. 4.30 वा. अ फ्यू अवर्स ऑफ स्प्रिंग हा फ्रेंच चित्रपट, तर 6.45 वा. कासव आणि रा. 8.45 वा. नदी वाहते हे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
शनिवार, दि. 20 जानेवारी 2018 रोजी स्क्रिन क्र. 2 येथे स. 10 वा. पुपा, दु. 12.30 वा. अकालेर संधाने हे बंगाली सिनेमे, दु. 2.30 वा. नेगार हा इराणी सिनेमा, दु. 4.30 वा. मारावी हा मल्याळी तर 6.30 वा. रेडू हा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तर स्क्रिन क्र. 3 येथे स. 10 वा. स्वयंमवरम् हा मल्याळी, दु. 12.30 वा. अ विक हा श्रीलंकन चित्रपट, दु. 4.00 वा. सीआरडी हा हिंदी तर 6.15 वा. डेस्पारडो स्केवर हा इस्रायली तर रात्री 8 वा. नाईन मंथ्स् स्ट्रेच हा फ्रेंच चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
रविवार, दि. 21 जानेवारी 2018 रोजी स्क्रिन क्र. 2 मध्ये स. 10 वा. अनाहत हा अमोल पालेकर दिग्दर्शित चित्रपट त्यांच्या उपस्थितीत दाखविण्यात येणार आहे. तर स. 11.45 वा. साऊंड ऑफ सायलेंस हा तिबेटीयन भाषेतील, तर दु. 1.30 वा. अ स्पेशल डे हा इराणी आणि दु. 3.30 वा. सर्वनाम हा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तर स्क्रिन क्र. 3 मध्ये स. 10.15 वा. द ट्रॅम्पोलीन हा क्रोशीयाचा चित्रपट तर दु. 12.30 वा. सिटी लाईट्स आणि दु. 2.45 वा. समर हे हिंदी चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
महोत्सवाचा समारोपाचा चित्रपट कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आय डॅनियल ब्लेक हा इंग्रजी चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहण्याकरीता प्रतिनिधी नोंदणीची सुरवात करण्यात आलेली असून जगातील व देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमे औरंगाबादच्या रसिकांना बघता यावे, याकरीता सर्वसामान्य नागरिकांकरीता केवळ तीनशे रुपये कॅटलॉग शुल्क आकारण्यात येणार आहे, तर ज्येष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात केवळ दिडशे रुपयांत या फेस्टिव्हलचा आनंद घेता येणार आहे. सहा जानेवारी पासून प्रतिनिधी नोंदणी सुरवात होणार असून 1) आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल 2) निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड 3) विशाल ऑप्टिकल्स, निराला बाजार 4) महात्मा गांधी भवन, शासकीय ग्रंथालयाशेजारी, समर्थ नगर 5) हॉटेल स्वाद, उस्मानपुरा 6) हॉटेल नैवेद्य, सिडको बसस्टॅण्ड 7) साकेत बुक वर्ल्ड, औरंगपुरा 8) जिजाऊ मेडिकल, टि.व्ही. सेंटर या केंद्रांवरती चित्रपट रसिकांना प्रतिनिधी नोंदणी करता येईल.
औरंगाबादचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्‍या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, औरंगाबाद विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, प्रसिद्ध चित्रपट समीक्षक व दिग्दर्शक तसेच महोत्सवाचे संचालक अशोक राणे, संयोजन समितीचे सचिव व प्रोझोन मॉलचे सेंटर हेड मोहम्मद अर्शद, उद्योजक उल्हास गवळी, सतीश कागलीवाल, प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष सचिन मुळे, डॉ. भालचंद्र कांगो, डॉ. श्रीरंग देशपांडे, महोत्सव निमंत्रक नीलेश राऊत,  महोत्सव समन्वयक शिवदर्शन कदम, जयप्रद देसाई, संतोष जोशी, शिव फाळके, बिजली देशमुख, डॉ. मकदूम फारूकी, डॉ. जयंत शेवतेकर, प्रा. दासू वैद्य, प्रा. मुस्तजीब खान, विजय कान्हेकर, सुनील किर्दक, सुहास तेंडूलकर, डॉ. रेखा शेळके, सुबोध जाधव, डॉ. संदीप शिसोदे, डॉ. आनंद निकाळजे, किशोर निकम, साकेत भांड, अनिलकुमार साळवे, प्रिया धारूरकर, मंगेश मर्ढेकर, गणेश घुले, मंगेश निरंतर, सचिन दाभाडे, निखील भालेराव, मयुर देशपांडे, श्रीकांत देशपांडे, दिपक पवार, महेश अचिंतलवार, रेणुका कड आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here