एन्ड्रेस हाऊजरने उभारला औरंगाबादमधील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प; दररोज 2,800 युनिटची निर्मिती

0
618

वाळूज औद्योगिक वसाहतीत असलेली एन्ड्रेस ॲण्ड हाऊजर कंपनी आता वीजही निर्माण करणार आहे! कंपनीच्या ७५० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. चार) करण्यात आले. ४८५ किलोवॅटची आपली क्षमता या नव्या प्रकल्पासह त्यांनी १.४ मेगावॅटवर नेली आहे.

तीन टप्प्यांत उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून गुरुवारी उद्‌घाटन झालेल्या प्रकल्पातून ७५० किलोवॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. यातून कंपनीच्या विजेची एकूण साठ टक्के गरज भागणार असून युनिट बंद असलेल्या दिवशी ही वीज महावितरणलाही देण्यात येणार आहे.

उद्‌घाटन सोहळ्यास फ्लोटेक इंडियाचे अध्यक्ष कुलथू कुमार, एमएसईडीसीएलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, सीआयआय औरंगाबादचे अध्यक्ष आणि एन्ड्रेस हाऊजरचे श्रीराम नारायण, जयेंद्र भिरूड, राहुल दासारी आदींची उपस्थिती होती.

ऑटोमॅटिक क्लिनिंग, युरोपपेक्षा चांगला प्रकल्प सगळ्या कंपनीच्या छतावर लावण्यात आलेल्या सोलार पॅनलची सफाई करण्यासाठीचे काम मोठे अवघड आणि वेळखाऊ आहे. धुळीने क्षमता घटत असल्याने पॅनलची सफाई करण्यासाठी ऑटोमॅटिक यंत्रणा तयार करण्यात आली आहे. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळही नेमण्यात आले असून यासाठीचे पाणीही पुन्हा वापरण्यात येणार आहे. हा प्रकल्प युरोपातील प्रकल्पांपेक्षा अधिक चांगला तयार करण्याचे आव्हान लिलया पेलले असल्याचे राहुल दासारी यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात प्रकल्प…
सौरऊर्जेचा पूर्ण फायदा घेत वीजनिर्मिती
दिवसाला २० लाख युनिट ऊर्जा तयार करणार
१०५० टन कार्बन विसर्ग घटणार
वीजबिलात पडणार पन्नास ते साठ टक्के फरक
उभारणीसाठी लागले सहा महिने
ऑटोमॅटिक क्‍लिनिंग तंत्रज्ञानाने सफाई सोपी
सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा खर्च

SOURCESakaal
Previous article300-crore turnover expected at 3-day Maharashtra Trade Fair at Chikalthana
Next articleऔरंगाबाद जिल्ह्यातील गड किल्ले – भाग 1: किल्ले अंतुर
CityKatta : Aurangabad's own social media platform

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here