शेंद्रा येथील ‘स्कील डेव्हलपमेंट सेंटर’करिता ‘एआयटील ऑरिक स्कील फाउंडेशन’ची स्थापना

0
12741

डीएमआयसी-ऑरिक, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत (एनएसडीसी) आणि उद्योजक संघटना यांच्या संयुक्त पुढाकाराने शेंद्रा येथे होणाऱ्या ‘स्कील डेव्हलपमेंट सेंटर’करिता ‘एआयटील ऑरिक स्कील फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. कंपनी एक्ट- सेक्शन 8 अंतर्गत स्थापन झालेल्या या संस्थेची स्थापना ७ जानेवारी २०२० रोजी करण्यात आली असून, नजीकच्या काळात ऑरिकमधील शेंद्रा या स्मार्ट औद्योगिक वसाहतीमध्ये हे सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे ‘एआयटील’च्या अधिकाऱ्यानी सांगितले.

३ एकरमध्ये होणार स्कील डेव्हलपमेंट सेंटर
ऑरिक आणि अन्य औद्योगिक वसाहतींमध्ये लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यसाठी शेंद्रा येथे कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा निर्णय झाला असून. या केंद्राच्या निर्मितीसाठी “एनएसडीसी’ने देखील रास दाखवल्यामुळे या औद्योगिक वसाहतीमध्ये देश पातळीवरची शैक्षणिक संस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे. कौशल्य विकासाचे महत्व ओळखून शेंद्रा वसाहतीमध्ये या सेंटरसाठी ३ एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात ऑरिक हॉल येथे तात्पुरत्या स्वरुपात चार ते पाच अभ्यासक्रमाने या सेंटरची सुरवात करण्यात येणार आहे.
या केंद्राचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून यात सहभागी होणाऱ्या उद्योजक संघटना / कंपन्यांना अभ्यासक्रम आखण्याचे स्वातंत्र्य राहणार आहे. या स्किल सेंटरच्या संचालक मंडळावर एआयटीलचे भास्कर मुंढे आणि कैलास जाधव यांचा समावेश आहे. इतर संस्थांच्या प्रतिनिधींची देखील संचालक मंडळावर नेमणूक करण्यात येणार असल्याचे ‘एआयटील’तर्फे सांगण्यात आले आहे.

Previous articleएमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्रातर्फे लोणार अभ्यास सहलीचे आयोजन
Next articleमनपा निवडणूक: आरक्षण सोडतीमध्ये अनेक दिग्गजांना धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here