चित्रपट चावडीत आज स्व. शशी कपूर यांच्या ‘आ गले लग जा’ चित्रपटाचे प्रदर्शन

0
249

शनिवार, दि. 30 डिसेंबर रोजी चित्रपट चावडीत स्व.शशी कपूर यांच्या ‘आ गले लग जा’ चित्रपटाचे प्रदर्शन.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय आयोजित चित्रपट चावडी या उपक्रमाअंतर्गत शशी कपूर यांना आदरांजली म्हणून त्यांचा 1973 साली प्रदर्शित झालेला ‘आ गले लग जा’ हा प्रसिद्ध सिनेमा शनिवार, दि. 30 डिसेंबर 2017 रोजी सायं. 5.00 वा. सभागृह, आईनस्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे.

चित्रपटाचे दिगदर्शक मनमोहन देसाई असून संगीत राहूल देव बर्मण यांचे आहे. चित्रपटात शशी कपूर यांची मुख्य भुमिका असून सोबत शर्मिला टागोर, शत्रुघ्न सिंन्हा, ओम प्रकाश आदी कलाकार आहेत. शशी कपूर यांच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांपैकी हा एक प्रमुख चित्रपट आहे. यातील गाणी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेली आहेत.

चित्रपट सर्वासाठी विनामुल्य असून रसिकांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद यांचा तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here