महापालिकेच्या वतीने ‘आपला वार्ड कोरोनामुक्त वार्ड अभियान’

0
2330

महानगरपालिकेच्या वतीने शहरात 11 मे सोमवार ते 24 मे रविवार या कालावधीत ” आपला वार्ड कोरोनामुक्त वार्ड” हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात दररोज विविध प्रकारच्या अँक्टीव्हीटीज करावयाच्या असून त्याचे नियोजन घरीच बसून नागरिकांनी करावे यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन मनपाचे प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी केले आहे.

11 मे रोजी कोरोनाला हरवण्यासाठी सामूहिक शपथ घेणे, 12 मे जनजागृती गीत गायन दिवस, 13 मे दीप महोत्सव, 14 मे कोविड योध्दांचे अभिनंदन दिवस, 15 मे अँन्टी कोरोना पोलीस स्थापना दिवस, 16 मे स्वतः चा सन्मान दिवस, 17 मे माझे गुरू-माझे आदर्श दिवस, 18 मे समुह गायन दिवस, 19 मे निबंध, लेख, चित्र काढणे दिवस, 20 मे रंगोत्सव दिवस, 21 मे माझे आरोग्य माझे हाती, 22 मे मीच माझा रक्षक, 23 मे दो गज दुरी, 24 मे आनंदोत्सव दिवस साजरा करण्यात येणार आहे.

14 मे रोजी कोरोना विरुध्दच्या लढाईत आपण सर्वजण लढवय्ये शामिल आहेत. परंतु पोलीस विभाग, आरोग्य विभाग, महानगरपालिका, महसूल विभाग अहोरात्र सेवा देत आहेत. या कोव्हिड योध्दांचे करने आवश्यक आहे. या करीता डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ, मनपा साफसफाई कर्मचारी, पोलीस, महसूल विभागाचे कर्मचारी यांच्या विषयी त्यांनी अहोरात्र दिलेल्या सेवेसाठी एक पान, 200 शब्दात पत्र लिहून ईमेलद्वारे अथवा फेसबुकवर पाठवणे, पत्र घरातील लहान मुलांनी स्वहस्ताक्षरात लिहलेले असावे.

हे पत्र Email ID, commissioner@aurangabadmahapalika.org
Facebook: https//www.facebook.com/comments.abdmahapalika/
Twitter:https//twitter.com/commissionerabd वर पाठवू शकतात.

17 मे रोजी माझे गुरु माझे आदर्श या विषयावर ज्यांना आपण आपल्या आयुष्यातील गुरु मानतात त्यांच्याबद्दल आठवणी 200 शब्दात लिहून काढणे. मनपाच्या ईमेल, फेसबुक, इस्टाग्रामवर अपलोड कराव्यात, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

Previous articleCovid-19 Aurangabad Dashboard
Next articleकोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – आरोग्य मंत्री राजेश टोपे
CityKatta : Aurangabad's own social media platform

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here