औरंगाबादमध्ये कोरोना टेस्ट करणारी मशीन दाखल
येथील शासकीय घाटी रुग्णालयात आता कोरोना टेस्ट होणार आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात ही सोय उपलब्ध झाली असून, औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या सूक्ष्मजीव शास्त्र विभागात कोरोना रुग्ण चाचण्या करण्याला आजपासून सुरूवात झाली आहे असे शासकीय रुग्नालाय्च्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
ही मशीन घाटी रुग्णालयाला गेल्यावर्षीच मंजूर झाली होती, मात्र निधीअभावी येऊ शकली नाही. आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिल्यानंतर हे मशीन औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये दाखल झाली आहे. आगामी काळात ही मशीन कार्यान्वित होईल आणि संपूर्ण मराठवाड्यातील रुग्णांच्या चाचण्या आणि रिपोर्ट मिळायालाही सुरुवात होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय आता होणार स्पेशल कोरोना हॉस्पिटल
औरंगाबाद इथं एक रुग्ण आढळला होता, तेव्हापासून इथेही मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये (मिनी घाटी) आता सोमवारपासून स्पेशल कोरोना हॉस्पिटल केले जाणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मिनी घाटीची पाहणी करून जिल्हा शल्यचिकित्सकांना तशा उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश दिले. सोमवारपासून मिनी घाटीत कोरोना संशयित व बाधितांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घाटी रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या अनेक रुग्णांचीसुद्धा प्रचंड काळजी घेण्यात येत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातही कोरोना फोफावत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोना पॉझिटीव्ह असणाऱ्या एका महिलेला रुग्णालयातून अखेर सुट्टी देण्यात आली. गेले दहा दिवस या महिलेवर कोरोनासाठीचे उपचार सुरू होते. आता ती महिला पूर्णपणे बरी झाली असून, तिला सोमवारी दुपारी रुग्णालयातून सोडले. यावेळी या महिलेने देवाचे आणि डॉक्टरांचेही आभार मानले. कोरोनाच्या आव्हानावर मात करून परतणाऱ्या महिलेच्या प्रकृतीमध्ये झालेली सुधारणाने अनेकांना दिलासा मिळाला आहे. आता कोरोना चाचणी होणारी मशिन येणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
GIPHY App Key not set. Please check settings