औरंगाबादमध्ये 962 कोरोनाबाधित, आज 61 रुग्णांची वाढ

0
3891
औरंगाबाद जिल्ह्यात आज 61 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 962 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
 
औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. औरंगाबाद शहरातील जालान नगर (1), उलकानगरी (1), रोहिदास हाऊसिंग सोसायटी (1), संजय नगर (1), सातारा परिसर (1), गणपती बाग, सातारा परिसर (6), विद्यानगर, सेव्हन हिल (1) , एन सहा,सिडको (1), पुंडलिक नगर (5), हुसेन कॉलनी (9), राम नगर (3), बहादूरपुरा (8), बारी कॉलनी, गल्ली नं. दोन (1), कबाडीपुरा, बुड्डीलेन (3), शरिफ कॉलनी (3), बाबर कॉलनी (3), सिंधी कॉलनी (1), न्याय नगर (1), न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी (1),सिल्क मिल कॉलनी (1), घाटी (1), रेंटीपुरा (1), बायजीपुरा, गल्ली नं. 23 (1), जाधववाडी (1), मकसूद कॉलनी (1) अन्य (2), तर कन्नड तालुक्यातील देवळाणा (2) या भागातील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 312 जण कोरोनामुक्त झाले आहेत, असेही कळवण्यात आलेले आहे.
 
आज तीनजणांचा उपचारादरम्यान मृत्यू
घाटीत आज तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 28, मिनी घाटीमध्ये एक आणि खासगी रुग्णालयात दोन अशा एकूण 31 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या घाटीत 70 कोरोनाबाधित उपचार घेताहेत, ज्यामध्ये 64 रुग्णांची स्थिती सामान्य, सहा रुग्णांची स्थिती गंभीर आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये रोशन गेट येथील गल्ली नं. पाच येथील 42 वर्षीय पुरूष रुग्णाचा आज (17 मे रोजी) मध्यरात्री 1.15 वाजता, शंभू नगर, गल्ली नं. 29 येथील 35 वर्षीय महिलेचा सकाळी सहा वा., बुड्डी लेन, रौफ कॉलनीतील 74 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने सकाळी 9.15 वा. मृत्यू झाल्याचेही कळवले आहे.
 
आतापर्यंत 312 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन गेले घरी
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जिल्ह्यात 962 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 312 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) या ठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. या यंत्रणेतील डॉक्टर्स, परिचारिका, ब्रदर्स, आरोग्य कर्मचारी, सेवक आदी कोरोना वॉरिअर्सच्या अथक परिश्रमातून व यशस्वी उपचारानंतर आजपर्यंत एकूण 312 रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत सर्वात अधिक म्हणजे 180 रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातून 112 रुग्ण बरे झालेले आहेत. तसेच घाटीतून 20 रुग्ण बरे झालेले आहेत, असेही कळविलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here