कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे मात्र कोरोना बाधित जसे मुंबई, नागपूर, पुणे, सांगली अशा ठिकाणांवरून येणाऱ्या नागरिकांनी नैतिक जबाबदारी ओळखून जिल्ह्यात येताच स्वतःला होम क्वारंटाईन ठेवण्याचे आवाहन विभागीय आयुक्त प्रशासनाने केले आहे. जेणेकरून आपले कुटुंब आणि पर्यायाने समाज सुरक्षित राहील.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून शासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
कोरोना बाधित ठिकाणांवरून आल्यावर जर कोणालाही 14 दिवसांत कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळल्यास त्यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधून तपासणी करावी असे आवाहन विभागीय आयुक्त प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
संपर्कासाठी विभागातील आठही जिल्हयातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे मोबाईल व त्यांचे दुरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहे.
औरंगाबाद – डॉ. सुंदर कुलकर्णी 7020843292, 9823070351, महापालिका मुख्य कार्यालय – 8956306007, घाटी रुग्णालय – 0240- 2402409, जिल्हा सामान्य रुग्णालय- 0240- 2951010
GIPHY App Key not set. Please check settings