औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री 477 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. पुन्हा रात्री उशिरा करीम कॉलनी, रोशन गेट येथील 30 वर्षीय महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नव्या 100 रुग्णांची भर पडल्याने काल (दि.8 रोजी) एकूण 478 कोरोनाबाधित रुग्ण आढळले.
तर आज (दि.9 रोजी) सकाळी नव्याने 17 रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 495 झाल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
आज वाढलेले शहरातील कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) संजयनगर, मुकुंदवाडी (६), कटकट गेट (२), बाबर कॉलनी (४), आसेफीया कॉलनी (१), सिल्क मिल कॉलनी (१), रामनगर-मुकुंदवाडी (१), भवानीनगर, जुना मोंढा (२) या परिसरातील आहेत. यामध्ये सात पुरूष आणि 10 महिलांचा समावेश असल्याचेही रूग्णालयाने कळवले आहे.