Corona Update: आनंदवार्ता ; औरंगाबामध्ये आणखी एक महिला कोरोनामुक्त, दोन आठवड्याच्या उपचारानंतर आज रुग्णालयातून डिस्चार्ज

0
4362

 औरंगाबाद शहरातील एन-4 परिसरातील एक महिला आता कोरोनामुक्त झाली आहे. तिचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शहरात कोरोनामुक्त झालेली ही दुसरी महिला ठरली आहे. रुग्णालयातून सुटताना या महिलेने डॉक्टरांचे आभार मानले. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा असे आवाहन केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील महिलेचे पती दिल्लीहून औरंगाबादेत परतले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. कोरोनाच्या लक्षणामुळे तपासणी करण्यात आली होती. मात्र, पतीसह अन्य नातेवाईक कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, ही ५८ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली.

दोन आठवड्यात केली मात
यानंतर जिल्हा रुग्णालयात ३० मार्चपासून महिलेवर उपचार सुरू होते. उपचाराच्या १४ व्या आणि १५ व्या दिवशी या महिलेचे २४ तासात दोन स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. या दोनपैकी एक अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला होता. दुसरा अहवाल काय येतो, याकडे जिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणेनेचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी रात्री हा दुसरा अहवालही निगेटिव्ह आला आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा निःश्वास घेतला.

Previous articleऔरंगाबादः लॉकडाऊननंतरचा कल, आव्हाने आणि उपाययोजना (भाग-१)
Next articleकोरोनानंतरचे शिक्षण क्षेत्रातील कल, आव्हाने आणि उपाययोजनाः डॉ. सुधीर गव्हाणे
CityKatta : Aurangabad's own social media platform

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here