औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 15 कोरोनाबाधित वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 297 झाले आहेत. कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) किलेअर्क (2), सावित्री नगर, चिकलठाणा (1), देवळाई (1), पुंडलिक नगर (2), नंदनवन कॉलनी (1), जय भीमनगर (3), संजय नगर (4), एन-11 हडको (1) या परिसरातील आहेत, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) सांगण्यात आले.
कोरोनाबाधित 297 रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण 21 ते 30 वयोगटातील 66 कोरोनाबाधित आहेत. त्यापाठोपाठ 31 ते 40 वयोगटातील 64 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. सर्वात जास्त वय असलेल्या 80 वर्षावरील एका रुग्णाचा समावेश आहे. वय वर्षे एक ते 10 वयोगटातील 24 रुग्ण आहेत. 11 ते 20 वयोगटातील 52, 41 ते 50 वयोगटातील 35, 51 ते 60 वयोगटातील 26, 61 ते 70 वयोगटातील 21, 71 ते 80 वयोगटातील आठ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. यामध्ये 166 पुरूष रुग्ण, 131 महिला रुग्ण आहेत. तर दहा मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या वयामध्ये 41 ते 50 वयोगटातील एका रुग्णाचा समावेश आहे. 51 ते 60 वर्षातील चार रुग्ण, 61 ते 70 वयोगटातील तीन रुग्ण, 71 ते 80 वयोगटातील दोन रुग्णांचा समावेश आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये पुरूष 56 टक्के तर महिला 44 टक्के असल्याचेही कळवले आहे.
GIPHY App Key not set. Please check settings