Covid19: Daily Update | 21 May 2020

0
433
#CoronaUpdate | 4 pm, 21 May 2020
जिल्ह्यात 1179 कोरोनाबाधित; दुपारी 6 रुग्णांची भर
औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी सहा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1179 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
आज आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये औरंगाबाद शहरातील मकसूद कॉलनी, एन-5 सिडको, एन-7 सिडको, पिसादेवी, राम नगर आणि कन्नड तालुक्यातील धनगरवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये दोन पुरुष आणि चार महिला आहेत.

#CoronaUpdate | 1 pm, 21 May 2020
औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ; मृतांचा आकडा ४१ वर
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. रोज सरासरी पन्नास पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. यामध्ये वयोवृद्ध लोकांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. हे दोन्ही रुग्ण असेफिया कॉलनी व रहेमानिया कॉलनी येथील होते. दरम्यान, या दोन्ही रुग्णाचा कोरोना अहवाल प्रतीक्षेत होता ; तो बुधवारी रात्री उशिरा मिळाल्याने आज गुरुवारी दुपारी घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.
#CoronaUpdate | 9 am, 21 May 2020
जिल्ह्यात 1173 कोरोनाबाधित, आज 54 रुग्णांची वाढ
औरंगाबाद जिल्ह्यात आज 54 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1173 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)
औरंगाबाद शहरातील गरम पाणी (1), शिवराज कॉलनी (1), कैलास नगर (1), सौदा कॉलनी (1), रेहमानिया कॉलनी (२), आझम कॉलनी, रोशन गेट (2), सिटी चौक (6), मकसूद कॉलनी (1), हडको एन-12 (1), जयभीम नगर (11), हुसेन कॉलनी, गल्ली नं.9 (1), खडकेश्वर (1), न्याय नगर, गल्ली न.18 (2), हर्सुल कारागृह (1), खिवंसरा पार्क,उल्कानगरी (2), टाइम्स कॉलनी, कटकट गेट (2), मुकुंदवाडी (5), आदर्श कॉलनी (1), काबरा नगर (1), उस्मानपुरा (3), हुसेन कॉलनी, गल्ली नं.10 (4) आणि पडेगाव येथील मीरा नगर (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 28 महिला व 26 पुरुषांचा समावेश

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here