औरंगाबाद येथे स्कूल ऑफ प्लानिंग एंड आर्किटेक्चर स्थापन करण्यासाठी आठवणीची शंभरी

0
363

मा. साहेब, आपण आम्हा करांना उभारण्याचा शब्द दिला होता. तरी आम्हांला विश्वास आहे की आपण आपला शब्द पूर्ण कराल करीता आपणांस आठवण क्रं.१००

गेल्या शंभर दिवसांपासून डॉ. जितेंद्र देहाडे यांच्याकडून, मुख्यमंत्र्यांना त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देणारे ट्वीट, ट्वीटरच्या माधमातून केले जात आहे. आज ट्वीटरवर #आठवणीचीशंभरी हे हैशटैग वापरून लोकांनी त्यांनी चालू केलेल्या अभियानाला पाठिंबा देत आहे. मराठवाड्याच्या विकासाला चालना देऊ शकणारे राष्ट्रीय पातळीवरील या संस्थेची घोषणा IIM नागपूरला पळवून नेल्याच्या बदल्यात २०१५ साली करण्यात आली होती. राज्य सरकारने या संस्थेसाठी 10करोड रुपायची तरतूद २०१६च्य अर्थसंकल्पात केली होती. पण तीन वर्षे उलटुन देखील याबाबत कोणतेही पाउल सरकारच्या वतीने घेण्यात आले नाही. प्रकाश जावडेकर यांच्याकडे या मंत्रालयाची जवाबदारी असून, ही संस्था पुण्याला नेण्याबाबत हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर डॉ. जितेंद्र देहाडे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देणारे ट्वीट केले जात आहे. शंभर दिवस झाले, तरी या संबंधी साधी दखल देखील सरकारकडून घेण्यात आली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. मराठवाड्याच्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन स्कूल ऑफ प्लानिंग एंड आर्किटेक्चर औरंगाबादमध्ये येण्यासाठी पाठपुरवठा केला पाहिजे, अशी भावना त्यांनी CityKatta सोबत बोलतांना मांडली

ट्वीटरवर या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मांडण्यात आलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया

मराठवाड्याच्या बाबतीत हे सरकार किती गंभीर आहे. हे दिसून येते किती ही पाठपुरावा केला तरी मराठवाड्याच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नाहीत. 100 दिवस पाठपुरावा करून ही सरकारच्या कानी आवाज जात नसेल तर मराठवाड्याच्या जनतेने याचा गांभीर्याने विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया सकाळ वृत्तपत्राचे मुख्य वार्ताहर शेखलाल शेख यांनी मांडले

स्कूल ऑफ प्लानिंग एंड आर्किटेक्चर औरंगाबाद येथे स्थापन व्हावे यासाठी आम्ही E-Petition दाखल केली आहे.
खाली दिलेल्या लिंकवर sign करून आपण देखील या मागणीला समर्थन देऊ शकता

Set up School of Planning & Architecture in Aurangabad ASAP

link: https://www.change.org/p/prakash-jawdekar-set-up-sp-a-in-aurangabad-asap

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here