in

दिनकर अस्तासी गेला !! श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रा.दिनकर बोरीकर यांचे निधन

श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रा.दिनकर बोरीकर यांचे आज दि.16.1.2018 रोजी सायं. 6.30 मि. आजारपणाने हायटेक-आधार हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांचे पार्थीव संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या आवारात बुधवार, दि.17.1.2018 रोजी सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे व तेथूनच त्यांची अंत्ययात्रा पुष्पनगरीकडे निघेल. अंत्यविधी पुष्पनगरी येथे सकाळी 11 वा. होईल.

अल्प परिचय :
प्रा.दिनकर बोरीकर प्रा.दिनकर बोरीकर जन्म ः 2 सप्टेंबर, 1935 (एम.ए.,बी.कॉम.एल.एल.बी.) अर्थशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक. हैदराबाद मुक्तिसंग्रामात मनमाड, लोणी, वाशीम येथे सामील. हैदराबाद येथे सेंट-ल को-ऑपरेटिव्ह युनियनमध्ये ‘सहकार समाचार’चे उपसंपादक. स्वामी रामानंद तीर्थांच्या आदेशानुसार तेलंगणा आणि हैदराबाद येथे खादी कार्य. भाषावार प्रांतरचनेनंतर औरंगाबादी स्थलांतर. स. भु. शिक्षण संस्थेच्या सेवेत. प्राध्यापकपदावरून निवृत्तीनंतर या संस्थेच्या सरचिटणीसपदी सन 1998 ते 2008, उपाध्यक्षपदी 2008 ते नोव्हेंबर 2011 व आता संस्थेच्या अध्यक्षपदी कार्यरत. स.भु. मासिक पत्रिकेच्या संपादकपदी कार्यरत. सोसायटी ऑफ व्हॅनगार्डस्, विचार प्रकाशन, सेक्युलर फोरम, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, स्वामी रामानंद तीर्थ मेमोरियल हैदराबाद, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती या संस्थांतून संचालकपद. गोविंदभाई यांच्या निकट सहवासात विविध क्षेत्रांत कार्यरत. गेल्या काही काळापासून ते औरंगाबादच्या काही दैनिक वृत्रपत्रात स्तंभलेखन करत होते. त्यातील काही निवडक लेख सोबतच्या पोस्टमध्ये देेेत आहोत.

प्रकाशित झालेली पुस्तके ः

1) मौलाना आझाद- एक पुनर्मूल्यांकन ः- लेखन व संपादन
2) मानव विकास व शैक्षणिक उत्कृष्टता ः- लेखन व संपादन
3) पुस्तकांच्या जगात ः- लेखन व संपादन
4) जनता पार्टी- आर्थिक धोरण ः- लेखन व संपादन
5) गोविंदभाई श्रॉफ गौरवग्रंथाचे संपादन ः- लेखन व संपादन
6) चंद्रगुप्त चौधरी गौरवग्रंथाचे संपादन ः- लेखन व संपादन
7) महात्मा गांधींच्या स्वप्नांतील ग्रामीण भारत ः- संपादन
8) फैसला (अनुवादित एकांकिका संग्रह) :- लेखन व संपादन
9) रंग तुझा कोणता? :- अनुवादित कवितासंग्रह ‘तुका म्हणे पुरस्कार’ प्राप्त
10) जगावं कसं :- लेखन
11) नांदा सौख्यभरे :- लेखन
12) वॉटर ऑफ लाईफ (स्वमूत्रोपचार) :- अनुवाद
13) गब्बरसिंग आणि इतर धमाल कथा :- लेखन
14) रविवारच्या शोधात बाल एकांकिका :- अनुवाद महाराष्ट्र राज्य शासनाचा “शाहीर अमरशेख पुरस्कार”.
15) पालकत्वाची गुपिते :- लेखन
16) ध्यान दर्शन :- ओशो अनुवाद
17) युवक, काम संबंध आणि प्रेम :- ओशो अनुवाद
18) दी वन मिनिट मॅनेजर :- अनुवाद
19) जगावं तर असंच ः- दुसरी आवृत्ती
20) दी पावर ऑफ नाऊ :- अनुवाद
21) शिवांबू साधना-स्वमूत्र चिकित्सा-शंका-समाधान :- लेखन
22) नार्को टेस्ट व इतर अनुवादित कविता ः- अनुवाद
23) सरदार वल्लभभाई पटेल आणि हैदराबादचे विलीनीकरणः- लेखन
24) बापू – लोकशाही समाजवादाचा वारकरी :- लेखन व संपादन
25) मुन्नी मोबाईल (कादंबरी) ः- अनुवाद
26) पाणपोई ः- लेखन
27) ओशो- ध्यानाचे प्रकार ः- अनुवाद
28) लीडरशिपचे रहस्य ः- अनुवाद
29) इव्ह अ‍ॅडम व सार्वजनिक जीवन आणि इतर लेख ः- लेखन (प्रकाशन 17 जुलै.15)
30) दो गज जमी भी ना मिली आणि इतर लेख ः- लेखन (प्रकाशन 17 जुलै.15)
31) गौरव एका हरफन मौलाचा ः- लेखन व संपादन(प्रकाशन 1 फेब्रु.16)
32) पडद्या आडची चक्रे ः- अनुवाद (प्रकाशन 9 फेब्रु.16)
33) शंकराचा आधुनिक अवतार ः निळकंठ कोठेकर स्मृती ग्रंथ ः- लेखन व संपादन (प्रकाशन 18 डिसेंबर 2016) 34) स्मरण असो त्यांचे ः- लेखन (प्रकाशन 28 जुलै, 2017)
35) चिंतन आणि चिंतनीय ः- लेखन (प्रकाशन 28 जुलै, 2017)
36) रूदाली (उषा गांगुली लिखीत नाटकाचा अनुवाद) ः- अनुवाद (प्रकाशन 28 जुलै, 2017)
37) पी.व्ही.नरसिंहराव लिखीत अयोध्या 1992 ही दैनंदिनी ः- प्रकाशनाच्या मार्गावर – अनुवाद

What do you think?

Written by Nikhil Bhalerao

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

रेल्वे विद्युतीकरण – नांदेड रेल्वे विभागात फूट बाय फूट सर्वे सुरु

5th Aurangabad International Film Festival Catalogue