Pic :Rahul Pawar

कसारा घाटातील समुद्रास वाहून जाणाऱ्या पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास औरंगाबाद व DMIC साठी होऊ शकतो २४ तास पाणी पुरवठा तसेच अहमदनगर, नाशिकची पाणी समस्या काही प्रमाणात कमी करणे शक्य आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मोठ्या व महत्त्वाकांक्षी योजना केल्याशिवाय पर्याय नाही. विशेषतः नवीन स्मार्ट सिटी, डी. एम. आई. सी., व मोठ्या प्रमाणावर शहरीकरण या मुळे पाण्याची गरज वाढत जात आहे व त्या प्रमाणात पाण्याची योजना न केल्यास अश्या योजना केवळ पाण्याअभावी सोडून देण्याची पाळी येईल. मुळात खात्रीशीर पाणी असल्याशिवाय आता नवीन उदयोगधंदे येणार नाहीत त्यामुळे मोठ्या योजनाकडे दुर्लक्ष करून लहान योजनेतून पाण्याचे प्रश्न सुटतील अशी आशा बाळगू नये. जायकवाडी खोरे तुटीचे आहे हे आता वेगवेगळ्या तज्ञ समितीने अभ्यास करून सांगितलेले आहे. २०१५ या काळात जायकवाडी धरणातील मृत साठ्यातून पाणी घेणे भाग पडले होते व वाळूज, चिकलठाणा येथील उद्योगांना पाणीकपात करण्याची वेळ आली होती.  लहान लहान जलयुक्त सारख्या योजना पाण्याच्या स्थानिक गरजा भागवतील. पण मोठ्या मागणीसाठी अश्या योजना पुरू शकत नाहीत हे पण लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

वैतरणेतील पाणी मुकनेमार्फत वळविण्याची  शिफारसही जुनीच असून, ती मा. चितळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या दुसऱ्या सिंचन आयोगाचे पान क्र. १८० खंड-१ वर नमूद केलेलीच आहे. हि शिफारस होऊन १८ वर्षाचा वर कालावधी लोटलेला आहे. सध्या अप्पर वैतरणेचे पाणी मुंबई वापरले जाते त्यामुळे सध्याच्या पाणीपुरवठ्यावर काहीही परिणाम न करताही किती पाणी या तुटीच्या भागात येईल हे यामध्ये विचारात घेतले आहे.

गोदावरी खोऱ्यात आधीच पाणी टंचाई असल्याने या खोऱ्यात इतर खोऱ्यातून पाणी वळविणे भाग आहे.  कोकण भागातून प्रवाही पद्धतीने (By gravity) पाणी वळविण्याच्या जागा अंदाजित २५ च्या आसपास आहेत. यापैकी २३ योजनावर काम सुरु असून त्यातून फक्त ५० ते ६०  दलघमी पाणी वळविले जाणार आहे. या व्यतिरिक्त फक्त एकच अशी योजना आहे कि ज्यापासून ७५० दलघमी आणता येते व त्यापैकी ५०० दलघमी पाणी प्रवाही पद्धतीने येते. हि योजना म्हणजे वैतरणा गोदावरी लिंक योजना. ही योजना एकदम न करता  टप्याटप्या सुद्धा करता येते त्यामुळे ज्या प्रमाणात निधी मिळेल त्या त्या प्रमाणे काम करता येईल.

 

1अत्यंत कमी खर्चात व कोणतेही भूसंपादन न करता करता येणारा टप्पा क्रमांक १

टप्पा 1:
या योजनेत वैतरणा धरणावर गेट बसवून सर्वप्रथम पुराचे समुदास वाहून जाणारे 57 दलघमी पाणी प्रवाही पद्धतीने पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावे. यामुळे वैतरणाच्या  सध्याच्या पाणीवापरावर काहीही बदल न करता हे करणे शक्य आहे . वैतरना धरणाची पूर्ण संचय पाणी पातळी ६०४ मीटर आहे. या पातळीच्या वर  पाणी गेल्यास ते सांडव्यावरून वाहून समुद्रास जाते. वैतरणा धरण कोकणात आहे. मुकणे धरण गोदावरी खोऱ्यात असून या धरणाची पूर्ण धरण पातळी ५९५ मी आहे त्यामुळे वैतरनेचे पाणी प्रवाह पद्धतीने मुकणे धरणात येते.  मुकने धरणाचे पाणी पुढे गोदावरी वरील नांदूर मधमेश्वर येथील वळण बंधाऱ्यातून हे गोदावरी नदीत येवू शकते. या साठी संपादित जागेत ३ ते ४ लोखंडी द्वारे वैतरनेच्या  saddle Dam वर बसवावी लागतील . या साठी केवळ ५ कोटी पर्यंत खर्च येईल.

 

2थोडाश्या भूसंपादनात बोगद्याद्वारे पाणी वळविन्याचा टप्पा 

 टप्पा २:    पुढच्या टप्प्यात वैतरनेच्या  सध्याच्या पाणीवापरावर काहीही बदल न करता जेवढे पाणी वैतरनेत आणता येईल तेवढे पाणी गोदावरीत खोऱ्यात याच गेट चा उपयोग करून आणता येईल.  दमनगंगेतील  उंचावरील ५७ दलघमी ( दोन अब्जघन फुट /TMC) पाणी  वैतरणा धरणात आणता  येते. या साठी ६०५ तलान्का वरील पाणी प्रवाही पद्धतीने कोणतीही विज खर्च न करता वळविने प्रस्तावित केले आहे. नकाशात दर्शविल्या जागी  ३ जागी वळण बंधारे बांधून ६.५ किलोमीटर बोगद्याद्वारे पाणी वळविणे शक्य आहे. या तीन वळण योजनेतून २५ चौरस किलोमीटर पानलोटातील पाणी वैतरनेत वळविता येते.  या साठी अंदाजित ९० ते १०० कोटी पर्यंत खर्च येईल. या योजनेत धरण बांधून पाणी साठा करण्याची आवश्यता नाही केवळ वळण बंधारे बांधून पाणी बोगद्याद्वारे वळविणे पुरेसे आहे.

3Diverting adjacent catchment  by Deep Continuous Contour Canal

थोडाश्या भूसंपादनात समतल कालव्याद्वारे पाणी वळविन्याचा टप्पा

पिंजाळ नदीच्या उंच भागातील पाणी (१.२५ टी. एम. सी.) कालव्याद्वारे (by Contour Canal) अडविणेनकाशात दाखवल्या प्रमाणे बोगदा अथवा कालव्याद्वारे ऊर्ध्व वैतरणा धरणा मार्गे गोदावरी खोऱ्यात वळविणे.

टप्पा ३ : पिंजाळ ही वैतरनेची उप नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणी समुद्रास जावून मिळते. या नदीचे ६०५ तलान्कावरील पाणी प्रवाही पद्धतीने कोणतीही विज खर्च न करता वळविने प्रस्तावित केले आहे . नकाशात दर्शविल्या जागी  ५५ किलोमीटर लांबीच्या  कंटूर कालव्याने १५ चौरस किलोमीटर पानलोटातील पाणी वैतरनेत वळविता येते.  वैतरनेच्या  सध्याच्या पाणीवापरावर काहीही बदल न करता ४३ दलघमी ( दीडअब्जघन फुट ) पाणी गोदावरीत खोऱ्यात टप्पा १ मध्ये बांधलेल्या गेटचा उपयोग करून आणता येईल. या साठी अंदाजित ५५ ते ६० कोटी खर्च येईल.

 

4कमी उंचीच्या व शेत जमिनीचे संपादन न करता होऊ शकणारी उपसा योजना

टप्पा ४ : नकाशात दर्शविल्या जागी  लहान धरण व केवळ १०० मीटर उंचीची उपसा योजना करून ५७ दलघमी ( दोन अब्जघन फुट TMC)  पाणी वैतरनेत आणणे व  टप्पा १ मध्ये बांधलेल्या गेट चा उपयोग करून हे पाणी गोदावरीत खोऱ्यात आणणे. या साठी अंदाजित १०० ते ११० कोटी खर्च येईल.

औरंगाबादला सध्या ७५ ते १०० दलघमी पाणी लागते. जायकवाडीवरून हे पाणी येते. जायकवाडीतून  उपसा करण्याची पातळी ४५० मी वर आहे. सिडकोची पाण्याची टाकी ६०० मी तलान्कावर आहे. १५० मीटरचे हे शीर्ष  व  ५० किलोमीटर मधील १०० मीटर घर्षण शीर्ष असे एकून २५० मीटरची उंचीची उपसा करून करून मग पाणी येते. या साठी दरवर्षी ३२ कोटी रुपये वीजबिलावर खर्च केले जातात. विजेवरील खर्च मोठया प्रमाणात वाचविता येईल. उंचावरील पाणी विनाकारण खालच्या पातळीवरील व लांब अंतरावरील जायकवाडीत जावू देण्यापेक्षा ते पाणी कल्पक पद्धतीने प्रवाही पद्धतीने १२ किलोमीटर अंतरावरील ४८१ तलान्कावरील टेम्भापुरीत आणणे व तेथून औरंगाबाद व वाळूजसाठी पाणीपुरवठा योजना केल्यास वीज, देखभाल दुरुस्तीवरील खर्च, १०० दलघमीचे बाष्पीभवन वाचवता येते. टेम्भापुरीसाठी ९०० हेक्टर जमीन संपादित केलीच आहे या जमिनीचे १.५ ते २ मी खोलीकरण करून १८ ते २० दलघमी चा जास्तीचा पाणीसाठा करणे शक्य आहे. तीन वर्षीच्या खर्च्याच्या बचतीत या योजनेवरील संपूर्ण खर्च वसूल होईल.

औरंगाबादसाठी वैतरणेच्या सॅडल धरणावर गेट बसून हे पाणी मुकणे धरण मार्गे नांदूर मधमेश्वर  डावा एक्सप्रेस कालव्याद्वारे थेट औरंगाबाद जवळील टेंभापुरीत आणणे शक्य आहे. या कालव्याच्या शेवटच्या भागातील ४९४ मी तलांकावरून २८ किलोमीटर लांबीच्या पाईप लाईनद्वारे हे पाणी टेंभापुरी धरणात आणता येते. टेंभापुरी धरणाची तळपातळी ४८१ मी  आहे त्यामुळे कालव्यातील पाणी टेंभापुरीत प्रवाही पद्धतीने (By Gravity) येऊ शकते यामध्ये शंका घेण्याचे काही कारण नाही.

पिण्याच्या पाण्यासाठी नवीन योजना करणे आवश्यक आहे कारण जुन्या योजना सिंचनासाठी असून त्याच योजनातून पिण्यासाठी पाणी पुरवठा योजना केल्यास सिंचनासाठी पाणी कमी पडते. या कारणामुळे पिण्याच्यापाण्यासाठी नवीन योजना करणे आवश्यक असते.

पाण्याची किंमत टंचाई काळात खऱ्या अर्थाने कळते. विशेषतः रेल्वेने ३५० किमी अंतरावरून डीझेल खर्चून पाणी आणण्याऐवजी प्रवाही पद्धतीने पाणी आणण्यात निच्छित व्यवहारी शहाणपणा आहे. कितीतरी योजना सुरु असल्या तरीहि ज्या योजनेतुन उद्योगांना व पिण्यासाठी खात्रीशीर पाणी मिळविण्याची शक्यता आहे त्या योजना आधी सुरु करणे हे फायदेशीर ठरते. वरील योजनेतील बहुतांश पाणी प्रवाही पद्धतीने वळविता येते त्यामुळे या  योजनेचा प्रकल्प अहवाल (DPR) बनविणे गरजेचे आहे. यातील कल्पनांची प्राथमिक खात्री Google Earth द्वारेही करता येते.

 

1 COMMENT

  1. Government Deparments, really Genious politicians, Mega Companies, NGOs and related agencies/organizations/Municipal Corporations/Councils/Zilla Parishads/ /Local Self Governments and all beneficiaries particularly MIDC, DMIC, Irrigation Department, Aurangabad Municipal Corporation shall take initiation to bring this scheme true by making a suitable proposituon to the Govt., preparing a feasible economic scheme, by making proportionate financial contribution. I have a hope from all mentioned above.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here