शहरात सर्व जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी औरंगाबाद फर्स्टने घेतला पुढाकार: emergency-needs.com संकेतस्थळावरून उपलब्ध केली सेवा
महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले आणि शहर अभियंता सखाराम पानझडे ह्यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने औरंगाबाद फर्स्टने जिवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
emergency-needs.com ह्या रविकिरण ईन्फोटेकने विकसित केलेल्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवरुन ही सेवा उपलब्ध होणे व किरण कुरिअर सर्व्हीस ह्यांच्या माध्यमातून वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचणे ह्यासाठी औरंगाबाद फर्स्टने समन्वय साधला असून, ह्या सेवेद्वारे औरंगाबाद शहराच्या रस्त्यावरची गर्दी काही प्रमाणात कमी करण्यासाठी मदत होईल अशी आशा संबंधितांनी व्यक्त केली.
ॲपवर सामान ऑर्डर केल्यावर पुढील मदत व समन्वयासाठी आपण ९६५४५३५०४१ ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
ह्या सेवेसाठी माफक सेवाशुल्क आकारले जाईल, ज्याची माहीती ऑर्डर घरी पोहोचवण्यापुर्वी सेवा अधिकारी आपणास देतील.
You can place your orders on following Website. After placing the order for any further support you can call given mobile number.
Note: Please do not give orders on mobile number.
Delivery time will be 9 AM TO 7 PM ONLY.
http://emergency-needs.com
+91 9654535041
GIPHY App Key not set. Please check settings