स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी लवकरच एक पथक आपल्या शहरात येत आहे. हे पथक शहरातील विविध भागात जाऊन तपासणी करणार आहे. या सर्वेक्षणाची तयारी म्हणून औरंगाबाद महानगरपालिकेने एक पत्रक सर्वत्र वाटले आहे, ज्यामध्ये पथकाकडून विचारण्यात येणर्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे हे नमूद केले आहे. या प्रश्नांव्यतिरिक्त देखील प्रश्न ते विचारू शकता याची भीती मनपाला आहे, पण अश्यावेळी सकारात्मक उत्तरे देऊन आपल्या मनपाला देशात पहिल्या दहा शहरात आणण्याची विनंती मनपाच्या वतीने करण्यात आली आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर याबाबत मनपा किती जागृत आहे याची प्रचिती मनपाच्या या जाहीर निवेदनातून दिसून येत आहे.