दोन दिवस एकही नवीन रुग्ण समोर न आल्याने काहीअंशी सुटकेचा निश्वास सोडलेल्या औरंगाबाद शहरात आज चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आरेफ कॉलनी, किराडपुरा व देवळाई भागात हे रुग्ण आढळून आले. हे चारही जण हे कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळचे नातेवाईक असून, त्यांच्या संपर्कात आल्याने चार जणांना बाधा झाली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.
सोमवारी आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये देवळाई येथील कोरोनाबाधित ड्रायव्हरची पत्नी (वय 40), किराडपुरा येथील रुग्णाची पत्नी (वय 35) व मलगी (वय 11), तर आरेफ कॉलनी येथील पुण्याहून आलेल्या कोरणाबाधित अभियंत्याचा आजोबा वय (70) यांचा समावेश आहे. औरंगाबादेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 24 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून, परिस्तिती नियंत्रणात राहण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आगामी काळात अधिक कठोर पाऊले टाकली जातील.
औरंगाबादचा समावेश रेड झोनमध्ये असल्याने लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यात शहरातील कोरोनाबंधितांची दिवसेंदिवस वाढणारी संख्येमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. सोमवारी आढळून आले चारही रुग्ण हे अगोदरच्या कोरोनाबधितांच्या घरातील सदस्य असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे अद्याप तरी कोरोनाबधितांच्या घरातील, नातेवाईक, यांच्या शिवाय बाहेरच्यांपर्यंत कोरोना पसरला नाही त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. आहे.