शहरातील कचराप्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. चिखलठाणा परिसरात स्वच्छता निरीक्षकास मारहाण केल्याची आज घटना घडली आहे. नारेगावाकडे कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांना चिखलठाणा भागात नागरिकांकडून अडविण्यात आले. संतप्त नागरिकांकडून कचरा संकलण करणार्या गाड्या फोडण्यात आल्या.
चिखलठाणा येथील एक जागा महापालिकेने कचरा टाकण्यासाठी निश्चित केली होती. मात्र, या जागेवर कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोध असून यातूनच ही मारहाणीची घटना घडल्याचे समजते.
औरंगाबादमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याच्या समस्येने गंभीर रुप धारण केले आहे. बुधवारी सकाळी चिखलठाणा परिसरात कचऱ्याच्या समस्येवरुन स्थानिकांनी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास मारहाण केली. स्वच्छता निरीक्षक प्रकाश आठवले यांना जमावाने मारहाण केली असून या घटनेनंतर मनपामधील सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करण्याची भूमिका घेतली. महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
GIPHY App Key not set. Please check settings