31 जानेवारी रोजी सुपरमून हा खग्रास चंद्रग्रहणात दिसणार आहे. सुपरमून- महिन्यात दुसरी पोर्णिमा म्हणून ब्ल्यू मून व चंद्र ग्रहण असल्याने ब्लड मून अशी एक अनोखी खगोलीय घटना पहायला मिळणार आहे.
पश्चिम आकाशात सुर्यास्त झाल्यावर पुर्व आकाशात चंद्र उगवेल. औरंगाबाद येथे सायंकाळी चंद्र उदय सायंकाळी 6:16 वाजता पहायला मिळणार आहे. यावेळेस चंद्र खग्रास स्थितीमध्ये उगवणार असुन पुर्व क्षितिजाजवळ दाट वातावरण असल्याने क्षितिजा पासून 10-12 अंशापर्यंत चंद्र पहायला मिळणार नाही ( सुरूवातीचे 20/22 मिनीटे).
31 जानेवारी 2018 रोजी चंद्र- पृथ्वी अंतर 3,60,985 कि.मी. असणार आहे (सरासरी 3,84,000 कि. मी. असते) यावेळेस चंद्र बींब 14% मोठा दिसणार आहे.
पुर्वेकडील पॅसिफीक समुद्राच्या मध्य ठिकाणी ग्रहणमध्य ड़ोक्यावर (झेनिथ)वर पहायला मिळणार आहे. मात्र भारतात ग्रहण सुरूवात झाल्यानंतर चंद्र उगवणार असल्याने ग्रहणाची सुरूवात पहायला मिळणार नाही. चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत असताना पुर्व आकाशात उगवत असल्याने महाचंद्र तांबूस ( Red Super Moon) आकाराने मोठे दिसणार आहे.
औरंगाबाद येथुन ग्रहणाच्या वेगवेगळ्या स्थिती दिसण्याच्या वेळा
भारतीय प्रमाण वेळेनुसार चंद्राचा पृथ्वीच्या विरळ छायेत प्रवेश: सायंकाळी 04:19:22
चंद्राचा पृथ्वीच्या दाट छायेत प्रवेश: सायंकाळी 05:18:18
खग्रास ग्रहण स्थिती सुरूवात: 06:21:47
खग्रास ग्रहण मध्य : 06:59:51
खग्रास ग्रहण स्थिती समाप्ती: 07:37:51
चंद्राचा पृथ्वीच्या दाट छायेतून मुक्ती : 08:41:11
चंद्राचा पृथ्वीच्या विर्ळ छायेतून मुक्ती (ग्रहण मोक्ष) : 09:38:34
सुपरमूनचे छायाचित्र काढण्याची संधी
सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. सायंकाळी थंडीही भरपूर प्रमाणात आहे. आजच्या ब्लड सुपर ब्ल्यू मूनचा आनंद घेण्यासाठी फक्त तयारी करायला हवी भर थंडीत अंगणात, टेरेसवर अथवा गावाच्या बाहेर शेतमळ्यात बसून एकटक अाकाशाकडे नज़र लावण्याची ! अन् कॅमेरातुन छबी टिपण्याची…
तर चला आपल्या औरंगाबाद शहरातील मधील ऐतिहासिक वास्तुंच्या पार्श्वभूमीवर आजच्या या रेड़ ब्लड सुपर ब्ल्यू मूनचे छायाचित्र काढुयात. गेल्या महिन्यात अनेक छायाचित्रकारांनी शहरातील वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी सुपरमूनचे छायाचित्र काढले. तर याही वेळेस वेगळ्या ठिकाणी जाऊन छायाचित्र काढावीत…
तर ठरवा आपले ठिकाण…
आपण काढलेले छायाचित्र आपल्या पूर्ण नाव, मोबाईल नंबरसह aurangabad@citykatta.com या इमेल आयडीवर पाठवावी.
अधिक माहितीसाठी –
श्रीनिवास औंधकर
संचालक,
एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ व विज्ञान केंद्र,
एमजीएम परिसर, एन-6, सिडको
औरंगाबाद – 431003
फोन : 9422171256