कलेला देण्याच्या प्रोत्साहनाच्या बाबतीत, सांस्कृतिक क्षेञात पुणे-मुंबईपेक्षा औरंगाबाद अजुनही खुप मागे आहे अशी नेहमी होत असलेली ओरड एेकुन औ.बाद ची रहिवासी म्हणुन वाईट वाटायचे पण आज हा समज खोटा ठरवत ग्लोबल होऊ पाहणारे औरंगाबाद कलाकारांच्या व त्यांना दाद देणार्या रसिकांच्या बाबतीत अजिबात मागे नाही याची प्रचिती आली. निमित्त होते दैनिक महाराष्ट टाईम्स आयोजित happy street चे…
खरं तर सार्वजनिक ठिकाणी , रस्त्यावर – चौकाचौकात जमुन आपल्या कलांचे प्रदर्शनकरणे भारतीय संस्कृतीत नवे नाही. आपल्याकडे निघणार्या विविध मिरवणुका , भरणार्या याञा,मेळे रामलीला कार्यक्रम हे आपल्याकडील happy street चे पारंपारिक स्वरुप…पण मधल्या काही काळात याचे महत्त्व कमी होत गेले तरी परदेशात माञ रस्त्यावर , चौकाचौकात आपल्या कला प्रदर्शित करणारे कलाकार सहजासहजी दिसतात…
Street food , street shopping या बाबी आज आपण सहजपणे स्विकारल्या असल्या तरी अशा प्रकारे रस्त्यावर जमून आपल्या कलांचे सादरीकरण आपल्याकडे थोडे नवीनच आहे. पण मुळात कला सादर करण्यासाठी जागा महत्त्वाची नसते तर त्यासाठी तशा प्रकारचे वातावरण गरजेचे असते. कला सादर करणारे कलाकार व त्यांना मनमुरादपणे दाद देणारे रसिक यातुन कलेसाठी निर्माण होणारी positivity संसर्गजन्य असते.त्यातुन कलेच्या विकासासाठी पोषक वातावरणनिर्मिती होते….
आणि म्हणुनच अशी वातावरण निर्मिती करणारे महाराष्ट टाईम्स सारख्या माध्यमांचे आणि त्यांना प्रतिसाद देणार्या औरंगाबादकरांसारख्या उत्साही नागरिकांचे स्मार्ट सिटी होऊ पाहणार्या औरंगाबाद शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्यात बजावत असलेल्या महत्त्वाच्या भुमिकेबद्दल विशेष अभिनंदन!!
– मंजिरी जोशी
शब्दसह्याद्री
GIPHY App Key not set. Please check settings