in

औरंगाबादेतील कचराकोंडी फुटणार, शहरातला कचरा कन्नडमध्ये नेणार, आमदार हर्षवर्धन जाधव यांची मनपाला ऑफर

औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी साठलेला २० हजार आणि रोज निर्माण होणारा ३०० टन कचरा कन्नडजवळच्या ५० एकर गायरानात टाका, अशी ऑफर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महापालिकेला दिली आहे. त्यानुसार रविवारपासून (१५ जुलै) कचरा नेऊन टाकण्याची तयारी केली आहे.

१६ फेब्रुवारी रोजी नारेगाव येथील डेपो आंदोलकांनी बंद केल्यापासून कचरा नेमका कुठे टाकावा, असा प्रश्न मनपापुढे होता. प्रशासनाने चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव तसेच शहराच्या आजूबाजूला कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. पण आजूबाजूला पाण्याचे स्रोत, नागरी वसाहती असल्याने लोकांनी प्रचंड विरोध केला. शिवाय आधी प्रक्रिया प्रकल्प उभे करा आणि नंतर कचरा आणा, असेही लोकांचे म्हणणे होेते. या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी स्वत: पुढाकार घेत गायरानाचा वापर करा, असे म्हटल्याने महापालिकेने त्याचे स्वागत केले. जाधव यांनी शनिवारी महसूल, मनपाच्या अधिकाऱ्यांना घेऊन जागेची पाहणी केली.

जाधव म्हणाले, काही दिवसांपूर्वी माझा मुलगा आजारी पडला. शहरात जागोजागी पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळेच त्याला आजारपण आले. अशी स्थिती इतरांची होऊ नये म्हणून मी कन्नडजवळची जागा कचरा डेपोसाठी देऊ केली आहे.

औरंगाबाद शहर ते कन्नड हे  ४०-५० किमी अंतर कापून हा कचरा नेला जाणार असल्याने त्याचे वाहतूक शुल्कात वाढ होईल. पण आजूबाजूला कोणतेही गाव किंवा पाण्याचे स्त्रोत नसल्याने लोकांचा संभाव्य विरोध होणार नाही अशी खात्री असल्याने मनपाने याचे स्वागत करत कचरा कन्नडपर्यंत नेण्यास संमती दिली, असे मत आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सिटीकट्टाशी बोलतांना सांगितले.

What do you think?

Written by Nikhil Bhalerao

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

Maharashtra government bats for solar project on Jaikwadi Dam

Tender floated for preparation of DPR for 8 lane Pune – Shirur Section (Part of Pune Aurangabad Economic corridor) under “Bharatmala Pariyojana