औरंगाबाद शहराला ढगफुटी पावसाने झोडपले, शहरातील सखल भागात मोठ्या नुकसानीची शक्यता
आज दिनांक ०७ सप्टेंबर २०२१ रोजी रोजी औरंगाबाद शहरावर सायंकाळी ०७:१० ला सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुढील दोन तीन मिनीटात, म्हणजे ०७:१२ वाजण्याच्या दरम्यान अतिशय रौद्र रूप धारण केले व ०८:१० या एका तासाच्या कालावधीत ढगफूटी पेक्षा जास्त वेगाने पाऊस झाला. सुरुवातीच्या तीस मिनीटाच्या काळात ( ०७:४० पर्यंत) पाऊस पड़ण्याचा सरासरी वेग हा १६६.७५ मीमी हा नोंदला गेला व या तीस मिनिटांच्या कालावधीत ५६.२ मी.मी पावसाची नोंद झाली. म्हणजेच औरंगाबाद शहरावर ढगफुटी पेक्षा वेगाने झोडपून काढले (ताशी शंभर मी. मी. किंवा जास्त पाऊस झाल्यास ढगफुटी म्हंटली जाते)
रात्री ०७:४० नंतर पावसाच वेग थोडा कमी होत गेला, ०७:५० पर्यंत सरासरी ८६.९ मी मी वेग होता व नंतर ०८:१० पर्यंत तो कमी होत ५३.२४ मीमी प्रति तास पावसाचा वेग राहिला
तर सायंकाळी ०७:१० ते ०८:१० या एका तासात ८७.६ मी. मी. औरंगाबाद शहरात पावसाची नोंद झाली
श्रीनिवास एस औंधकर
संचालक ,
एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लब
GIPHY App Key not set. Please check settings