ICT मराठवाडा उपकेंद्रासाठी ३९७ करोड रुपयाची मंत्रिमंडळाची मंजुरी; येत्या शैक्षणिक वर्षात होणार सुरवात

4 मेला होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. येत्या शैक्षणिक वर्षापासूनच प्रवेश सुरू होणार आहेत.

0
190

मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या प्रस्तावित रसायन तंत्रज्ञान संस्थेसाठी राज्य सरकारने ३९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.  येत्या ४ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संस्थेचे भूमिपूजन होणार. विशेष म्हणजे या संस्थेत येत्या शैक्षणिक वर्षापासूनच प्रवेश सुरू होणार आहेत.

जालन्याचे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासोबतच येथे चांगल्या दर्जाच्या उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यादृष्टीने रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी), मुंबई याचे उपकेंद्र मराठवाड्यात स्थापन करण्या संबंधी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर जालना शहरापासून जवळच असलेल्या सिरसवाडी शिवारात या संस्थेसाठी दोनशे एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी जालना शहरात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संस्थेकडे ही जागा सुपूर्द करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संस्थेसाठी ३९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केले.

अशी आहे आयसीटी टेक्नॉलॉजी संस्था
मुंबई येथे १९३३ मध्ये रसायन तंत्रज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात आली. या संस्थेने १९ पद्मभूषण, ५०० मोठे उद्योजक दिले. मुकेश अंबानींसारखे उद्योजक हे या संस्थेचे विद्यार्थी आहेत. या संस्थेत विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांचा समावेश असून देशभरातून जवळपास ५०० विद्यार्थी या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी जालना शहरात येतील.

फाइल झाली क्लियर
आयसीटी ला निधी देण्याचा प्रस्ताव सोमवारी पूर्ण झाला. मंगळवारी तो मंत्रीमंडळासमोर ठेवला आणि या संस्थेसाठी निधी मंजूर केला. लवकरच कामाला सुरुवात होईल असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले..  येत्या शैक्षणिक वर्षात येथे अभ्यासक्रमाला सुरवात होईल.

भरती प्रक्रियेला सुरवात
www.ictmumbai.edu.in या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या वेबसाईटवर ५ मार्च ते ३१ मार्च दरम्यान भरती प्रक्रियेची सुरवात करण्यात आली आहे. या उपकेंद्रासाठी एकूण १२१ शिक्षक आणि १५८ शिक्षकेतर पदाची भरती करण्यात येणार आहे.
या वर्षीच्या शैक्षणिक वर्षासाठी विविध पोस्टसाठी खालीलप्रमाणे अर्ज मागवण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here