औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेत विविध मागण्यांसाठी चर्चा केली.
यावेळी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातुन जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यमुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्याचा परीणाम औरंगाबादच्या औद्योगिक विकासावर होऊ नये, तसेच डीएमआयसी, एमआयडीसी, ऑरीक सिटी यासारख्या नवीन विकासकामावर त्याचा परिणाम होऊ नये याकरिता इतर नवीन आंतरराष्ट्रीय व खाजगी विमान वाहतूक कंपन्याची विमानसेवा तात्काळ सुरु करावी, अशी आग्रही मागणी शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली.
या निवेदनाची दखल घेत सर्व विनंती मान्य करून विमान कंपन्याशी बोलणी करून आपल्यला लवकरात लवकर, औरंगाबादची विमान सेवा सुरुळीत करण्यात येईल असें आश्वासनही केंद्रीय मंत्र्यानी दिले.