देशातली अग्रगण्य दुचाकी उत्पादक कंपनीने फॉक्सवॅगन ग्रुपच्या ऑडी कंपनीच्या गाडीच्या चेसिस निर्मितीकरिता औरंगाबाद येथे नवीन प्रकल्पाची घोषणा केली आहे. कंपनीचे चेयरमन यांनी याबाबत सिटीकट्टाशी बोलतांना याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचे सांगितले.
भारतीय दुचाकी क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या या कंपनीला Audi आणि BMW याच्या कॉम्पोनंट निर्मितीसाठी ऑर्डर मिळाली आहे. त्यापैकी काही गुंतवणूक ही औरंगाबाद येथील प्रकल्पात केली जाईल, तर काही अहमदाबाद येथे ऑटो ट्रान्समिनिशन क्षेत्रात होईल. VW ग्रुपने नुकतेच भारतीय वाहन क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. INDIA2.0 योजने अंतर्गत भारतामध्ये १ बिलियन युरोची गुंतवणुकीची घोषणा केली होती.
औरंगाबादमध्ये असलेली ऑटो इकोसिस्टीममुळे आम्ही औरंगाबादला शहराची निवड केली. ऑटो इंडस्ट्रीमध्ये होणारे बदल लक्षात घेऊन, त्या अनुषंगाने आगामी काळात कंपनी गुंतवणूक करेल, असे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
औरंगाबादमधील ऑटो क्षेत्र आणि लघुउद्योजकांना होणार मोठा फायदा: राम भोगले
ऑटो इंडस्ट्रीमधला मोठा उत्पादक औरंगाबादमध्ये आल्यास येथील लघुउद्योजकांना त्याचा खूप फायदा होईल. CMIA यासाठी सर्वतोपरी मदत करेल. कंपनीने अधिकृत घोषणा केल्यावर त्यावर बोलणे अधिक सयुक्तिक होईल,असे सीएमआयएचे अध्यक्ष राम भोगले यांनी सांगितले.