औरंगाबाद विमानतळावरून आंतरराष्ट्रीय हवाईसेवा सुरु होण्यासंदर्भात हालचालींना वेग आला असून काळ ( ता.२९) रोजी इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबाद विमानतळाला भेट देऊन येथील सुविधांची पाहणी केली. तसेच येथून लवकरच आंतरराष्ट्रीय हवाईसेवा सुरु करण्यासाठी सकारात्मकत दर्शवली. देशांतर्गत कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत औरंगाबाद विमानतळ बरेच मागे पडत होते, क्षमता असतानाही येथून विमानसेवेला उतरती कळा लागली. मात्र, औरंगाबादला नव्या उड्डाणांन गती देण्यासाठी नागरी उड्डयण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. राजधानी दिल्लीमध्ये यासंदर्भात सर्व विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांच्या प्रतीनिधीसोबत मंगळवारी (ता. २८) रोजी बैठक घेऊन नागरी उड्डयण मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाधी यांनी औरंगाबाद येथून हवाईसेवा सुरु करण्या संदर्भात निर्देश दिले, तसेच उडान योजनेंतर्गत पर्यटन मंत्रालयासोबत भागीदारी करून येथील पर्यटनाला चालना देऊ शकतील अशा मार्गांवर हवाईसेवा सुरु करण्यासंदर्भात पाऊले उचलली जातील असे सांगितले.
पाठ्पुराव्यांना यश
औरंगाबाद विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाईसेवा सुरु होण्यासंदर्भात वेग आला असून या आठवड्यात दोन प्रमुख घटना या आठवड्यात झाल्या आहेत. त्यामुळे विमानतळ संचालक, पर्यटन क्षेत्रांतील स्टेकहोल्डर्स, उद्योजक, राजकारणी आणि मीडिया याांनी केलेल्या पाठपुराव्याला आता यश येतााना दिसत आहे. औरंगाबाद विमानतळ संचालक यांनी यासंदर्भात माहिती देतानां सांगितले कि आम्ही सातत्याने येथून सेवा सुरु करण्या संदर्भात पाठपुरावा करत होतो, नागरी उड्डयण मंत्रालयाने पुढाकार घेऊन काही कंपन्यांशी सेवा सुरु करण्यासंदर्भात बोलणी केली असून, लवकरच औरंगाबाद विमानतळावरून देशांतर्गत मुंबई, दिल्ली, बंगलोर आणि काही अन्य शहरांना आणि आंतरराष्ट्रीय हवाईसेवा सुरु होईल, अशी आशा करूया.
लवकरच येईल प्रयत्नांना यश: राम भोगले
नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी मालवण येथे भेट झाली असता औरंगाबाद विमान सेवेसंदर्भात तत्काळ पाऊले उचलली जावी असा आग्रह केला, त्यावर नविन सरकार स्थापन झाल्यावर वेग देऊ, असे आश्वासन दिले आहे.
– राम भोगले, अध्यक्ष सीएमआयए
राजस्थान, बुद्धिस्ट सर्किटशी औरंगाबाद जोडले जावे: जसवंतसिंह
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा राजस्थान, बुद्धिष्ट सर्किटशी हवाई संपर्क असावा, अशी मागणी आम्ही सातत्याने करत आलो आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात असावी याकरिता देशातील प्रमुख शहरांशी ‘उड्डाण’ योजनेच्या माध्यमातून औरंगाबाद शहराची हवाई जोडणी करावी, यासाठी देखील सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
– जसवंत सिंह राजपूत, अध्यक्ष, टूरीजम प्रोमोटर्स गिल्ड, औरंगाबाद
दूरदृष्टी ठेवून विकास करावा: आशिष गर्दे
औरंगाबादमधून अनेक वेळा नवीन सेवा सुरु होण्यासंदर्भात घोषणा झाल्या मात्र प्रत्येक्षात आहे त्या सेवा कमी होताना मागील काही वर्षात अनुभवले. येथील विभागच्या एकूण प्रगतीसाठी येथून देशांतर्गत, अंतरराष्ट्रीय आणि कार्गो सेवा सुरु करण्यासंदर्भात दूरदृष्टी ठेवून मोठी पाऊले उचलली पाहिजे. नवीन सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.
– आशिष गर्दे, उद्योजक