दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत विकसित होत असलेल्या ऑरीक या देशातील पहिल्या स्मार्ट ओद्योगिक वसाहतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इन्फोसिस, टीसीएस सह अनेक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आमंत्रण देण्यात आले आहे. ऑरीकच्या मार्केटिंगसाठी MIDC आणि AITL यांनी नुकताच दिल्ली, हैदराबाद आणि बेंगलोर येथे रोड शो आयोजित केले होते, तसेच येथील उद्योग जगताला औरंगाबादमध्ये गुंतवणूक करण्यासाठी साद घातली.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी स्वतंत्र क्षेत्र राखीव
मागील काही वर्षात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्या विस्तारीकरणासाठी जागा शोधत असताना टियर टू शहरांकडे वळत आहेत आणि ऑरीक यासाठी योग्य पर्याय असल्याचे ऑरीकच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. एआयटीएलचे सह व्यवस्थापक गजानन पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, नव्याने तयार करण्यात आलेला ऑरीक हॉल या प्रशासकीय इमारतीमध्ये 2.5 लाख चौरस फूट जागा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या वसाहतीमध्ये काही जागा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, यामध्य्ये प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा देण्यात येतील.
काही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे दिले आश्वासन
‘स्मार्ट इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन’ म्हणून प्रोजेक्ट करण्यात आलेल्या शेंद्रा आणि बिडकीनमधील या औद्योगिक वसाहतीच्या सुविधांची माहिती जाणून घेण्यासाठी आयटी (माहिती तंत्रज्ञान), उत्पादन क्षेत्र, ऑटो, इलेक्ट्रॉनिक आदी क्षेत्रांतील कंपन्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यापैकी 4-5 मोठ्या कंपन्यांनी औरंगाबाद येथे भेेेट देऊन पुढील गुंतवणुकीचा विचार करू, असे आश्वासन दिले. पुढील काही आठवड्यात इफोसिस आणि टीसीएस यांचे प्रतिनिधी ऑरीकला भेट देऊन येथील सुविधांची माहिती घेतील, असे गजानन पाटील यानीं सिटीकट्टाशी बोलताना सांगितले.
देशात ऑरीकने घेतली आघाडी, लवकरच होणार औपचारिक उदघाटन
शेंद्रा बिडकीन वसाहतीचे मूलभूत पायाभूत सुविधांचे काम आता अंतिम टप्यात आले आहे. त्यामुळे ऑरीकच्या प्रमोशनचे काम आता वेगाने करण्यात येत आहे. देशात या नोडने विकास कामाच्या बाबतीत चांगलीच आघाडी घेतली असूूून, जुलैअखेर काही कंपन्याचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल. त्याच सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या औद्योगिक वसाहतीचे उदघाटन करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.
GIPHY App Key not set. Please check settings