औरंगाबादेत जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप मिररची देशातील एकमेव प्रतिकृती.
आज ‘नासा’च्या जेम्स वेब अंतराळ दुर्बीणीचे थेट प्रक्षेपण” एमजीएम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रातर्फ पाहण्याची व्यवस्था
अमेरिकेच्या नासा संस्थेकडून “जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप” अंतराळात पाठवण्यात येणार आहे. विश्व उत्पत्तीच्या अद्भूत व गूढ संकल्पनांचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोल शास्त्रज्ञ व अभ्यासकांसाठी अत्यंत मार्गदर्शक व एक मोलाचा टप्पा ठरणार तर आहे. या अंतराळ दुर्बिणीच्या माध्यमातून आगामी दशकात खगोल अंतराळ संशोधनात मोलाची भर पडणार आहे. या निमीत्त औरंगाबाद शहरातील महात्मा गांधी मिशनचे एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब मध्ये “जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप”ची प्रतिकृती, माहिती फलक व त्याच्या भव्य अशा आरशाचे (१६ फुट रुंद x २० फुट उंची) आकार असलेला सेल्फी पॉईंट उभारण्यात आला असून त्याचे लोकार्पण-उद्घाटन तसेच जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपच्या पेपर किटचे अनावरण मा.श्री. अंकुशरावजी कदम, कुलपती एमजीएम विद्यापीठ व मा. श्री आशिष गाडेकर -कुलसचिव, एमजीएम विद्यापीठ या मान्यवरांच्या शुभ हस्ते आज सकाळी शुक्रवार, दि. २४ डिसें. २०२१ रोजी सकाळी १०:३० वाजता संपन्न झाले.
यावेळेस विज्ञान केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांनी येत्या काळात जेम्स वेब अंतराळ दुर्बीणीतुन प्राप्त होणाऱ्या खगोलशास्त्रीय माहितीचा खजिना समोर ठेवला.
यावेळी जेम्स वेब व हबल स्पेस टेलीस्कोप या दोन दुर्बीणीमध्ये वापरण्यात आलेल्या आरशांची मुळ आकाराची प्रतिकृती विज्ञान केंद्र परिसरात उभारण्यात आली असून आपल्याला यांच्या बाजुला उभे राहून फोटो काढण्याची संधी मिळणार आहे.
अशा प्रकारची ही आपल्या देशातील पहिलीच प्रतिकृती असुन ह्या सेल्फी पाॅईंट सोबत माहिती ही असल्याने नक्कीच सर्वाना आवडेल असा अभिप्राय मान्यवरांनी यावेळेस व्यक्त केला.
या प्रसंगी प्राचार्य बी. एम पाटील, श्री. लाला राजपुत, डाॅ. समीना पठाण, निलेश हारदे, सौ. रुपाली औंधकर, शहरातील विज्ञान प्रेमी नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अशोक क्षीरसागर व योगेश साळी, सिध्देश औंधकर, हरिष केवारे, शिवम बुधे यांनी सहकार्य केले.
आज थेट प्रक्षेपण पहायला मिळणार
अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’, युरोपियन स्पेस एजन्सी तसेच कॅनडा स्पेस एजन्सी यांच्या वतीने शुक्रवार दि. २५ डिसेंबर २०२१ रोजी “जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप” ही अत्याधुनिक अंतराळ दुर्बीण पृथ्वीवरून अंतराळात पाठवण्यात येणार आहे.
अर्थातच या महत्वपूर्ण घटनेचे साक्षीदार होता यावे या अनुषंगाने औरंगाबाद शहरातील विज्ञान व खगोल प्रेमी नागरिकांसाठी महात्मा गांधी मिशनचे एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब तर्फे जेम्स वेब अंतराळ दुर्बीणीचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एमजीएम जेएनईसी परिसरातील आईनस्टाईन सभागृहात सायंकाळी चार पासून हे प्रक्षेपण पहाता येईल. हा कार्यक्रम नि:शुल्क दाखवण्यात येणार आहे. यावेळेस विचारण्यात येणाऱ्या शंकांचे समाधान केले जाणार आहे.
विविध उपक्रमांचे आयोजन
तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या खगोल वैज्ञानिक सृजनशीलतेला (Creativity) प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दि. २६ डिसें. (रविवार) रोजी पूर्व प्राथमिक ( इयत्ता १ ली ते ४ थी ) विभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी रंग भरण व चित्रकला तर प्राथमिक ( इयत्ता ५ वी ते ७ वी ) व माध्यमिक (इयत्ता ८ वी ते १० वी) विभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंधलेखन व “जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप” पेपर मॉडेल कार्यशाळा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दिनांक २६ डिसेंबर (रविवार) रोजी सायंकाळी साडेचार वाजता एमजीएम जेएनईसीच्या आईनस्टाईन हाॅल मध्ये या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप महोत्सवाचा समारोप होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे दिल्या जातील, दुर्बिणीबद्दल पीपीटी द्वारे माहिती व ‘नासा’ कडून प्राप्त माहितीपट ही दाखविण्यात येणार आहे.
या महोत्सवात सहभागी होण्यासाठी मोबाईल व्हाटसअप क्र. ९८५००८०५७७ यावर पुर्वनोंदनी करणे आवश्यक आहे. या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब, औरंगाबाद यांनी केले आहे.
Covid-19 संसर्ग प्रतिबंधक सुरक्षा नियमांतर्गत, सदर उपक्रमा दरम्यान सहभागी विद्यार्थ्यां मध्ये सुरक्षित अंतर, फेस मास्क, सँनिटायझर द्वारे हात स्वच्छता या नियमांचे पालन करणे सक्तीचे असेल.
– श्रीनिवास औंधकर
संचालक,एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब, औरंगाबाद
GIPHY App Key not set. Please check settings