भारतीय शिल्पकलेचा मुगुटमणी, वेरूळचे एका अखंड पाषाणात कोरून काढलेले कैलास लेणे. गुंफा क्रमांक सोळा ह्या गद्य नावाने कैलास लेण्याची कागदोपत्री नोंद असली तरी हे पूर्ण मंदिर आहे, आणि तरीही, एका महाकाय पाषाणखंडातून कोरून काढलेले असल्यामुळे हे मंदिर एक अद्वितीय शिल्पदेखील आहे. वेरूळच्या लेण्यामध्ये बौद्ध, जैन आणि हिंदू अश्या तिन्ही भारतीय धर्मपंथांची लेणी आहेत, पण ह्या सर्व लेण्यांच्या सुंदर हाराच्या मधोमध असलेले कैलास लेणे हे त्या हारातले रत्नजडित सुवर्णपदक आहे.
राष्ट्रकूटांचा राजा दंतिदुर्ग याच्या कारकीर्दीत सातव्या शतकात वेरूळमध्ये काही हिंदू लेण्या कोरण्यात आल्या होत्या. कदाचित त्याच वेळी ह्या ठ