औरंगाबाद येथून विमानसेवेची सुरवात करणाऱ्या इंडिगो या कंपनीचे मुंबई-औरंगाबाद या पाच तारखेचे पहिल्या विमानची वैमानिक म्हणून औरंगाबादची पहिली महिला पायलट कीर्ती राऊत यांचाकडे देण्यात आली आहे. ५ फेब्रुवारीला सकाळी 6.25 वाजता मुंबई औरंगाबाद या विमानसेवेने इंडिगो प्रारंभ करणार आहे. हे विमान औरंगाबाद विमानतळावर सकाळी ७ वाजून 25 मिनिटाने पोहचणार आहे.
पहिल्या विमानाची वैमानिक म्हणून जवाबदारी असलेली कीर्ती सदाशिव राऊत ही औरंगाबाद शहराची रहिवासी असून तिचे प्राथमिक शिक्षण सेंट झेव्हिअर्स शाळेत झाले आहे. देहराडून येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या २२ व्या वर्षापासून २००६ मध्ये वैमानिक म्हणून तिने या क्षेत्रात कामाला सुरवात केली. औरंगाबादची पहिली महिला पायलट होण्याचा मन हि तिने मिळवला होता. २०१२ पासून इंडिगो कंपनीत कार्यरत असेलेल्या कीर्ती राउत यांना विशेष करून मुंबई- औरंगाबाद सेवेच्या उद्घाटन सेवेचा उद्दन्कारिता पायलट म्हणून कंपनीकडून जवाबदारी देण्यात आली आहे. १४ वर्षाच्या करियर मध्ये तिने ६००० तासांपेक्षा अधिक उड्डाण केले आहे.
GIPHY App Key not set. Please check settings