बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील ह्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे खगोलीय व भौगोलिक महत्व जाणुन घेण्यासाठी एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्रातर्फे दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी लोणार अभ्यास सहलीचे आयोजन केले होते.
पहिल्या अभ्यास सहली साठी तीस जणांनी सहभाग नोंदवला.
लोणार येथील विवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली असुन हे बेसॉल्ट खडकातील जगातील एकमेव मोठे आघाती विवर आहे तर महाराष्ट्राच्या सात आश्चर्यां पैकी “लोणार सरोवर” एक गणले जाते.
सकाळी नऊ वाजता लोणार येथे पोहचल्यावर सर्वांना अभ्यास कीट देण्यात आले. विवराच्या उत्तर टोका जवळ गेल्यावर केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर व गाईड शैलेश यांनी विवराची प्राथमिक माहिती दिली व ग्रुप फोटो घेतल्यावर सर्वांनी धारा समुह मंदिराला भेट दिली व महत्त्व जाणून घेतले. नंतर साधारण पाचशे फुट खोल असलेल्या विवरामध्ये उतरल्यावर येथील खारे पाणी त्याचे रासायनिक व जैविक महत्व तसेच उल्का पिंड कोसळून झालेल्या आघातामुळे येथील मातीतील झालेले चुंबकिय बदल यासंदर्भात प्रयोग केले.
एकुणच लोणार सरोवराचे खगोलीय, भौगोलिक, सरोवरातील प्राणी जीवन, ऐतिहासिक, पौराणिक, जैवविवीधतेचे महत्व समजावून घेण्याची संधी मिळाली. यातुन लोणार सरोवराचे जागतिक महत्व आपणास समजणार आहे.
नंतर लोणार सरोवरातील व परिसरातील अनेक मंदिरे, गावातील दैत्यसुदन मंदिर, झोपलेल्या मारुती मागील वैज्ञानिक सत्य उलगडुन दाखवण्यात आले
ही सहल यशस्वी करण्यासाठी विज्ञान केंद्रात संचालक श्रीनिवास औंधकर, समन्वयीका सौ धनश्री कासार व अधिक्षक अशोक क्षीरसागर यांनी प्रयत्न केले .
आता पुन्हा एकदा ०२ फेब्रुवारी (रविवार) या दिवशी लोणार अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे.
यात सहभागी होण्याचे आवाहन विज्ञान केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले आहे.
मर्यादित प्रवेश उपलब्ध असून या साठी ३० जानेवारी २०२० पर्यंत तुमचा प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे.
✨ *अधिक माहितीसाठी,*✨
महात्मा गांधी मिशन
ए पी जे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब.
एमजीएम स्पोर्टस् क्लब समोर,
एमजीएम कॅम्पस, एन-6 सिडको, औरंगाबाद. 431003 (महाराष्ट्र).
मो.नं: 9850080577
फो.नं: 240-2480577
ईमेल: mgmapjscicentre@gmail.com
फेसबुक :@mgmscicenter
वेबसाईट: www.mgmapjscicentre.org